Tarun Bharat

वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

आंतरराष्ट्रीय मल्ल नरसिंग यादव 74 किलोत प्रतिनिधित्व करणार.

वार्ताहर/ औंध

 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तोंडावर रविवारी पुण्यात मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेची निवड चाचणी पार पडली. अव्वल दर्जाचे अनेक मल्ल या निवड चाचणीत सहभागी झाले होते. जागतिक पदक विजेता नरसिंग यादव 74 किलो वजनगटात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

23 ते 24 जानेवारी दरम्यान नोएडा (उत्तरप्रदेश ) येथे  65 वी वरिष्ठ पुरुष फ्री-स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र संघांची (षुरुष) संघाची निवड चाचणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र कात्रज (पुणे) येथे कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, तांत्रिक सचिव प्रा. बंकट यादव, कार्यालीन सचिव ललित लांडगे यांच्या उपस्थितीत पार पडली. मोठय़ा कालावधीनंतर आखाडय़ात शड्डू घुमणार असल्याने राज्यातील कुस्तीशौकिनांचे लक्ष या निवड चाचणीकडे लागले होते. निवड चाचणी म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. मात्र कुस्तीगीर परिषदेने शासनाने कोरोनाबद्दल घालून दिलेल्या नियम आणि अटीचे तंतोतंत पालन करीत निवड चाचणी यशस्वी केली.

वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे

57 किलो विजय पाटील (कोल्हापूर),

61 किलो सुरज कोकाटे (सोलापूर),

65 किलो अक्षय हिरुगडे (कोल्हापूर),

70 किलो कालिचरण सोलनकर (सोलापूर),

74 किलो नरसिंग यादव (मुंबई),

79 किलो समीर शेख (सोलापूर),

86  वेताळ शेळके (सोलापूर)

92 किलो पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) 

97 किलो  सिकंदर शेख, (सोलापूर)

97-125 किलो शुभम सिदनाळे (कोल्हापूर) 

 यशस्वी मल्लांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 विष्णू  खोसे, गणेश जगताप, मुन्ना झुंझुरके, आदर्श गुंड, कौतुक डाफळे,  आदी खुल्या गटातील मल्ल आजच्या निवड चाचणीत सहभागी झाले होते. मात्र चुरशीच्या लढतीत त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले.

Related Stories

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण

Archana Banage

राज्य सरकार झुकलं; छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला यश

Abhijeet Khandekar

मोठा भाऊ म्हणून मी सोबत;धनंजय मुंडेंची बहीण पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट

Archana Banage

पक्षासाठी सून करतेय सासूविरोधात प्रचार

datta jadhav

सातारा पालिकेची प्लास्टिकमुक्त हॉटेल मानांकन स्पर्धा

Patil_p

माणचा सुपूत्र देशासाठी हुतात्मा

Patil_p