Tarun Bharat

वरी खिचडी

Advertisements

साहित्य : 1 वाटी वरी तांदूळ, 3 वाटय़ा पाणी, 2 मध्यम आकाराचे बटाटे, 2 चमचे तूप, 4 काजू, 4 बदाम, 1 चमचा जिरे, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, 4 कढीपत्ता पाने, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, सजावटीसाठी ओलं खोबरं, चवीपुरते मीठ, 1 चमचा लिंबूरस

कृती : काजूचे तुकडे करून घ्यावेत. बदाम थोडा वेळ पाण्यात घालून, सोलून तुकडे करून घ्यावेत. वरी तांदूळ निवडून पुरेशा पाण्यात पंधरा मिनिटे भिजत घालावेत. गरम तुपात काजू आणि बदाम हलक्या सोनेरी रंगावर तळावेत. त्याच गरम तुपात जिरे टाकून परतवावे. नंतर कढीपत्ता टाकून परतवावा. आता त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, बटाटय़ाचे बारीक तुकडे आणि मीठ घालून मिश्रण दोन ते तीन मिनिटे परतवावे. बटाटे शिजले की त्यात वरीचे तांदूळ घालावेत. नंतर पाणी व लिंबूरस घालून मिश्रण मिक्स करावे. झाकण ठेवून मिश्रण वाफेवर शिजवावे. तयार वरी खिचडी कोथिंबीर, खोबरं, काजू, बदामने सजवून खाण्यास द्या.

Related Stories

कुरकुरे मोमोज

Omkar B

ओट्स टिक्की

Omkar B

दही चिकन

tarunbharat

सुपरफूड

tarunbharat

दही शोरबा

tarunbharat

साबुदाणा वडा

tarunbharat
error: Content is protected !!