Tarun Bharat

वरुण गांधींचा भाजपला रामराम ?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

गेल्या काही दिवसांपासुन भाजप नेते खासदार वरुण गांधी यांनी भाजपला घऱचा आहेर देत पक्षनेतृत्वाने घेतलेल्या निर्णायावर प्रश्न चिन्ह निर्माण होईल अशा आशयाची वक्तव्य केली आहेत. यामुळे पक्षनेतृत्वावर नाराज असलेले खासदार वरुण गांधी भाजपामधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहे.याच बरोबर वरुण गांधी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे ही चर्चा आहे. ममता बॅनर्जी आजपासून दिल्लीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी आणि वरुण गांधी यांची भेट होणार असल्याचं ही बोललं जात आहे.

यावेळी वरुण गांधी टीएमसीमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून वरुण गांधी यांनी अनेकदा जाहीरपणे भाजपावर टीकाही केली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या पुर्वी सोशल मीडियावर वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या धोरणावर टीका केली. केंद्र सरकारकडून घेतले गेलेले निर्णय तसेच पक्षाच्या धोरणांविरोधात सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळेच वरुण गांधी हे लवकरच भाजपाचा निरोप घेऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी वरुण गांधी नेमकी काय भुमिका घेणार ? ते भाजपला राम राम ठोकणार का ? राम राम ठोकणार असतील तर नेमका कोणत्या पक्षात प्रवेश करणार या सर्व चर्चांना गांधी पुर्ण विराम कसा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Stories

चालत्या गाडीतून गुटखा थुंकणे पडले महागात; भरावा लागला 500 रुपये दंड

Tousif Mujawar

कोरोना, वादळ, पाऊस मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळेच – नारायण राणे

Archana Banage

तामिळनाडूत बिगरब्राह्मण पुजारी नियुक्तीची तयारी

Patil_p

स्थितीनुसार पाठिंब्याचा निर्णय- चौधरी

Patil_p

Sindhudurg Crime : व्हेल माशाच्या उल्टीच्या तस्करी प्रकरणी देवगडमध्ये सहा जण ताब्यात

Archana Banage

मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे…

datta jadhav