Tarun Bharat

वरेरकर नाटय़संघातील चित्र प्रदर्शनाची सांगता

प्रतिनिधी / बेळगाव

येथील वरेरकर नाटय़ संघाच्या के. बी. कुलकर्णी कलादालनात भरलेल्या चित्रप्रर्शनाची मंगळवारी सांगता झाली.

बळगाव एअरपोर्टचे संचालक राजेशकुमार मौर्य, उदयोन्मुख चित्रकार हेमकुमार टोपीवाला यांची जलरंगातील चित्रे आणि नम्रता मौर्य यांनी काढलेल्या छायाचित्रांचे हे प्रदर्शने भरले होते. सांगता समारंभास सुभाष फोटो स्टुडिओचे संचालक सुभाष ओऊळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रारंभी जगदीश कुंटे यांनी वरेरकर नाटय़ संघातर्फे राजेशकुमार, नम्रता व हेमकुमार यांचे प्रदर्शन भरविल्याबद्दल अभिनंदन केले. राजेशकुमार व हेमकुमार यांनी आपल्याला कलादालन उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.

सुभाष ओऊळकर यांनी एक सुंदर आर्ट गॅलरी बेळगावकरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल वरेरकर नाटय़ संघाचे कौतूक केले आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अनेक चित्रकार व कलारसिक उपस्थित होते.

Related Stories

शहराच्या दक्षिण भागात 27 रोजी वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

सिद्धिविनायक फौंडेशनतर्फे सुवर्ण सिंहासनासाठी मदत

Patil_p

कांदा दरात 300 रुपयांची घसरण : आवकही वाढली

Amit Kulkarni

बांधकाम परवान्याचा तिढा जैसे थे : नागरिकांचे हाल

Amit Kulkarni

येळ्ळूर प्रवेशद्वाराजवळील ‘तो’ कचरा हटवा ग्रामपंचायतने लक्ष देण्याची विद्यार्थ्यांची मागणी

Omkar B

रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनचा अधिकारग्रहण समारंभ

Patil_p