Tarun Bharat

वरेरकर नाटय़ संघात रंगभूमी दिन साजरा

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

रंगभूमी दिनानिमित्त वरेरकर नाटय़ संघात नटराज पूजन करण्यात आले. कोविडमुळे मोठा कार्यक्रम न करता, संघाचे कार्याध्यक्ष अशोक याळगी, कार्यवाह जगदीश कुंटे व सहकार्यवाह वृषाली मराठे यांनी नटराजाला पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी अशोक याळगी यांनी गतस्मृतींना उजाळा दिला.

संघाच्या स्थापनेपासून आजतागायत रंगभूमी दिन साजरा करण्याच्या परंपरेत खंड पडला नाही, असे सांगून ते म्हणाले की, संघाच्या उर्जितावस्थेत, वैभवकाळात किंवा संस्थेच्या पडत्या काळातही रंगभूमी दिन साजरा करण्याची परंपरा आपण पाळली आहे. येथून पुढच्या काळात नव्या कलाकारांना उत्तेजन देऊन संघाला नवी झळाली प्राप्त करून देण्यासाठी झटूया. याप्रसंगी वृषाली मराठे यांनी आपले विचार मांडले. जगदीश कुंटे यांनी स्वागत करून शेवटी आभार मानले.

Related Stories

घरोघरी गौरीच्या जेवणाचा थाट

Amit Kulkarni

एक नळ दोन बिलाबाबत चौकशी करा

Amit Kulkarni

कैदी गिरवताहेत रंगकामाचे धडे

Amit Kulkarni

नंदगड एपीएमसी अध्यक्षांवर अविश्वास ठराव संमत

Amit Kulkarni

जुन्या म.फुले रोडचे अखेर डांबरीकरण

Patil_p

गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी गर्दी

Amit Kulkarni
error: Content is protected !!