Tarun Bharat

वर्कआउट नंतर प्रोटीन खाताय

अनाबॉलिक विंडोची संकल्पना फिटनेसच्या दुनियेत अनाबॉलिक विंडो आवश्यक मानली जाते. या संकल्पनेवरुन आपण
विचारात पडला असाल.व्यायामानंतरची ही एक लहान टाइम फ्रेम आहे. व्यक्तीला स्नायू बळकट होण्यासाठी प्रोटीनची गरज भासते, हे सर्वांनाच ठावूक आहे. व्यायामानंतर स्नायू हे खूपच संवेदनशील होतात आणि अशावेळी ते प्रोटिन चांगल्या रितीने ओढून घेऊ शकतात, या विचारावर ही संकल्पना आधारलेली आहे. म्हणून व्यायामानंतर एका तासाच्या आत किंवा तासापर्यंत प्रोटीन न घेतल्यास स्नायू बळकट होत नाही किंवा बळकट होण्याची प्रक्रिया थांबते,  असे समजले जात होते.

तासात प्रोटीन घेणे आवश्यक आहे काय

अनेक वर्षांपासून व्यायामप्रेमी लोकांना एकच सल्ला दिला जाता आणि तो म्हणजे व्यायामानंतर प्रोटिनचे सेवन करायला हवे.

अलिकडेच एका अभ्यासाने ही संकल्पना पूर्णपणे मान्य केलेली नाही. या क्षेत्रातील तज्ञांच्या मते, वेळेकडे लक्ष न देता दररोज प्रोटिनची गरज भागवायला हवी.

जून 2017 मध्ये जर्नल ऑफ इंटरनॅशनल सोसायटी फॉर स्पोर्टस न्यूट्रीशनने दिलेल्या सल्ल्यानुसार ऍनाबॉलिकचा प्रभाव हा 24 तासांपर्यंत राहतो. म्हणजेच तो संपूर्ण दिवसभरात कधीही प्रोटीनचे सेवन करु शकतो.

मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत ऍथलिट मंडळींना एका तासात प्रोटीन घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अन्य लोकांना ही बाब बंधनकारक नाही. त्यामुळे आपण संपूर्ण दिवसभरात प्रोटीन दोन तीन टप्प्यात घ्यावे. त्याचबरोबर तीन वेळचे भोजन आणि स्नॅक्सला प्रोटीनमध्ये समाविष्ट करावे.

किती प्रोटिनची गरज

एका साधारण व्यक्तीच्या शरिराच्या वजनानुसार प्रति किलोच्या 0.8 ग्रम प्रोटीनचे सेवन करणे गरजेचे आहे. मात्र  व्यायाम करतो, तेव्हा फिटनेसच्या ध्येयानुसार त्याचे प्रमाण बदलते. जी मंडळी नियमित एक तासापेक्षा व्यायाम करत असतात, त्यांच्या बॉडी आणि वजनानुसार प्रति किलो 1-1.2 ग्रम प्रोटीनचे सेवन करणे गरजेचे आहे. गरजेपेक्षा प्रोटीनचे अधिक सेवन करु नये. अशी कृती केल्यास शरिरात प्रोटिन फॅटप्रमाणे जमा होत राहते आणि वजन वाढते.

– प्रा. विजया पंडित

Related Stories

‘मंकीपॉक्स’ रोखण्यासाठी ५ हजार ३०० लसींचे वाटप

Rohit Salunke

आला पावसाळा; हेल्दी आरोग्यासाठी जाणून घ्या टिप्स

Archana Banage

तुमची नखे पिवळी पडतात का? या टिप्स फॉलो करा

Archana Banage

Back Pain : पाठदुखीने त्रस्त आहात, या छोट्या ट्रिक्स वापरून पाहा

Archana Banage

व्हेरिकोज व्हेन्स

Omkar B

हिरड्यांचे आरोग्य जपण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Kalyani Amanagi