Tarun Bharat

वर्ल्डकपमध्ये आज लंका-नामिबिया यांच्यात सलामी

प्राथमिक फेरीच्या माध्यमातून 4 संघ मुख्य गटासाठी पात्र ठरणार

गिलाँग / वृत्तसंस्था

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सलामी लढतीत आज (शनिवार दि. 16) श्रीलंका-नामिबियाचे संघ आमनेसामने भिडत आहेत. काही कालावधीपूर्वी आशिया चषक जिंकणारा लंकन संघ अर्थातच फेवरीट असून नामिबियाचा संघ कितपत टक्कर देऊ शकणार, ते पहावे लागेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. शिवाय, हॉटस्टार ऍपवर लाईव्ह स्ट्रिमिंग असणार आहे.

गेरहार्ड इरास्मूसच्या नेतृत्वाखालील नामिबियाने यापूर्वी युगांडा (2-1) व झिम्बाब्वेविरुद्ध (3-2) लागोपाठ मालिकाविजय संपादन केले असून येथे पात्रता फेरीत प्रतिस्पर्धी संघांना एक-दोन धक्के देण्याचा या संघाचा प्रयत्न असेल.

गिलाँगमधील सायमंड्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या मैदानावर यापूर्वी एकच टी-20 सामना खेळवला गेला असून त्या सामन्यात धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी ठरला होता.

श्रीलंका-नामिबिया यांच्यात आजवर एकच टी-20 सामना झाला असून त्यात लंकेने 7 गडी राखून बाजी मारली होती. 2021 टी-20 वर्ल्डकपमधील त्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना नामिबियाचा डाव सर्वबाद 96 धावांवर गुंडाळला गेला. लंकेतर्फे महिश तिक्षणाने त्यावेळी 25 धावात 3 बळी घेतले होते. नंतर भानुजा राजपक्षने 27 चेंडूत नाबाद 72 धावा फटकावत संघाला सहज विजय मिळवून दिला होता.

सध्या लंकन संघ उत्तम बहरात असून सलामीवीर पथूम निस्सांका व कुशल मेंडिस प्रारंभापासूनच आक्रमक पवित्र्यावर भर देणे अपेक्षित आहे. नामिबियाची बरीचशी भिस्त गेरार्ड इरास्मूससह गोलंदाजी अष्टपैलू जेजे स्मिट व डावखुरी फिरकीपटू बर्नार्ड स्कॉल्झवर असेल.

रोहित शर्मा म्हणतो, टी-20 वर्ल्डकप बुमराहपेक्षा महत्त्वाचा नाही!

स्पीडस्टार जसप्रित बुमराहला या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळवले असते तर त्याची कारकीर्द धोक्यात आली असती. तो धोका आम्हाला पत्करायचा नव्हता. आमच्यासाठी बुमराहपेक्षा टी-20 वर्ल्डकप महत्त्वाचा नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय कर्णधार रोहित शर्माने केले. बुमराह खेळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या जागी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आले आहे. भारत आपला पुढील सराव सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या (सोमवार दि. 17) खेळणार आहे.

Related Stories

पाटणा पायरेट्सची तेलुगू टायटन्सवर निसटती मात

Patil_p

वनडे मालिकेत भारताची विजयी सलामी

Patil_p

भुवनेश्वर कुमारवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया

Patil_p

जर्मनीच्या व्हेरेव्हचे आगमन विजयाने

Patil_p

भारताची 3 बाद 146 धावांपर्यंत मजल

Patil_p

भारतीय तिरंदाजांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Patil_p