Tarun Bharat

वर्ल्ड कप सुपरलीगमध्ये भारत सातव्या क्रमांकावर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आयसीसी पुरुषांच्या वर्ल्ड कप सुपरलीग क्रमवारीत भारताला बढती मिळाली असून ते आता सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. इंग्लंडविरुद्ध रविवारी झालेल्या तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यात सात धावांनी रोमांचक विजय मिळवित भारताने मालिकाही जिंकली, त्याचा लाभ त्यांना झाला आहे.

या सामन्यात व मालिकेतही पराभव झाला असला तरी इंग्लंडने 40 गुणांसह या क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे. सुपरलीगमध्ये इंग्लंडने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यापैकी 4 त्यांनी जिंकले तर 5 गमविले आहेत. भारताने 6 सामने खेळले असून त्यापैकी 3 जिंकले व 3 गमविले आहेत. इंग्लंडचे 40 तर भारताचे 29 गुण झाले आहेत. सुपरलीग फेरी 30 जुलै 2020 पासून इंग्लंड-आयर्लंड यांच्या मालिकेपासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आयसीसीच्या 12 पूर्ण सदस्यांसह नेदरलँड्सचाही समावेश आहे. नेदरलँड्सने 2015-17 आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिप जिंकून या स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. पहिले आठ क्रमांक मिळविणाऱया संघांना 2023 मध्ये भारतात होणाऱया विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळणार आहे. भारत या स्पर्धेचा यजमान असल्याने ते आपोआपच पात्र ठरले आहेत. मात्र लीगचा भाग असल्याने भारताला त्यात खेळावे लागणार आहे.

Related Stories

तिरंदाजी स्पर्धेत भारताचे दुसरे पदक निश्चित

Patil_p

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नेमारचे 10 लाख डॉलर्स

Patil_p

आयर्लंडविरुद्ध मालिकेसाठी हार्दिक पंडय़ा कर्णधार

Patil_p

टॉफेल, टकर, किटलबॉरो पंच पॅनेलमध्ये

Patil_p

ब्रिटनचा एडमंड पुढील फेरीत

Patil_p

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी फेडरर, सेरेनाचा सहभाग निश्चित

Patil_p