Tarun Bharat

वर्ल्ड बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलरचा निधी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वर्ल्ड बँकेने भारताला एक अब्ज डॉलरचा आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधी मंजूर केला आहे. वर्ल्ड बँक आपत्कालीन अर्थसहाय्यता योजनेतून पहिल्या टप्प्यात 25  देशांना 1.9 अब्ज डॉलरची मदत करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड बँकेने भारताला भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री तसेच इतर उपाययोजनांसाठी वर्ल्ड बँकेकडून आपत्कालीन अर्थसहाय्यता निधी देण्यात येणार आहे. वर्ल्ड बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने जगभरातील विकसनशील देशांसाठी आपत्कालीन सहाय्यता योजनेच्या पहिल्या टप्प्यात 25 देशांच्या  निधीला मंजुरी दिली.     वर्ल्ड बँकेने भारताला सर्वाधिक म्हणजेच 1 अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून भारताला कोरोनावर मातकरण्यासाठी चांगले स्क्रीनिंग, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळा, व्यक्तीगत सुरक्षा उपकरणेखरेदी करण्यासाठी मदत मिळेल, असे वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.   

 वर्ल्ड बँकेने पाकिस्तानसाठी 20 कोटी डॉलर, अफगानिस्तानसाठी 10 कोटी डॉलर, मालदीवसाठी 73 लाख डॉलरआणि श्रीलंकेसाठी 12.86 कोटी डॉलरचा निधी मंजूर केला आहे.

Related Stories

अलिबागमध्ये NDRF, नौदलाकडून युद्धपातळीवर मदतकार्याला सुरूवात

datta jadhav

अदानींनी अंबानी, झुकरबर्गलाही टाकलं मागे

Archana Banage

पाकिस्तान : बेनजीर भुट्टो यांचा मुलगा बिलावल भुट्टो कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

खासगी इस्पितळांमध्ये कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी दर निश्चित

Patil_p

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर

Archana Banage

मृत्यूदंड का जन्मठेप, दोन आठवडय़ांत घ्या निर्णय

Patil_p