Tarun Bharat

वर्षभरात कोरोनाच्या लढय़ात गोवेकरांनी जास्तीत जास्त बुद्धी मिळविली

डॉ. मधु घोडकिरेकर यांचे आवाहन

प्रतिनिधी / मडगाव

काल सोमवारी 22 मार्च रोजी राष्ट्रीय जनता कर्फ्युला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर देशात राष्ट्रीय लॉकडाऊन पाळण्यात आला. एक वर्षभर कोरोना महामारीचा मुकाबला सर्वांनी केला. तरी कोरोना अद्याप संपलेला नाही. या एक वर्षात गोवेकरांनी अनेक अनुभव घेतलेय. त्यात कोरोनाच्या लढय़ा संदर्भात तर बरीच बुद्धी प्राप्त केलेली आहे. या बुद्धीच्या जोरावरच आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे असे डॉ. मधु घोडकिरेकर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

आरोग्य विभाग जेव्हा आवाहन करतो, तेव्हा त्या संदेशाकडे गांभीर्याने पाहण्याची जबाबदारी आपली आहे. माननीय पंतप्रधानांच्या आवाहनावर देशात पहिल्या 14 तासांचा राष्ट्रीय जनता कर्फ्यू होता. कोविड-19 विषाणूने गेल्या 365 दिवसात सर्वांना चांगला धडा शिकविला.

गेल्या एका वर्षात कोविड-19 ने गोव्यात एक टेंड लावलाय. त्यात प्रत्येकी एक हजार पॉझिटिव्ह रूग्णांपैकी जवळपास 14 व्यक्तींचा बळी जातो. सध्या गोव्यात एका दिवसात सुमारे 100 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतात आणि या 100 रूग्णांमध्ये एक किंवा दोन व्यक्तींचा बळी जात आहे.

16 सप्टेंबर रोजी गोव्यात एका दिवसात जास्तीत जास्त 600 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह प्रकरणे आढळली होती आणि पुढच्या दोन-तीन दिवसांत, एकाच दिवशी जवळपास सात ते आठ मृत्यूची नोंद झाली होती. गोव्यात मृत्यूची टक्केवारी जवळपास 1.5 राहिली आहे. सहा महिन्यांनंतरही टक्केवारी जवळपास सारखीच आहे. त्यात बदल झालेला नाही.

आपले आवाहन सोपे आहे, फक्त पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाटा इत्यादी वगैरे विसरून जा. लक्षात ठेवा की, कोविड-19 प्रकरणे आपल्याला प्राप्त होईपर्यंत हा विषाणू अस्तित्त्वात असे पर्यंत जवळजवळ समान रीतीने मृत्यूचे प्रमाण चालूच राहिल. गोव्यात पहिल्या मृत्यूची नोंद झाल्यानतंर गेल्या 12 महिन्यांत जवळजवळ हजार मृत्यूंच्या जवळपास पोचलो आहोत.

आपल्याला माहित आहे का,r या प्राणघातक विषाणूमुळे कोणीही आपली प्रिय व्यक्ती गमावू इच्छित नाही.

गोवेकर हे बुद्धीमान आहेत, मला आशा आहे, त्यांनी प्राणघातक विषाणूविरूद्ध लढाईच्या विरोधात वर्षात जास्तीत जास्त बुद्धी मिळविली आहे आणि त्याच बुद्धीच्या जोरावर कोरोनाला पराभूत केले जाईल असे गोमेकॉचे फॉरेन्सिक मेडिसिनचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मधु घोडकिरेकर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Related Stories

जबाबदारी पेलण्यास सक्षम : डॉ. नूतन बिचोलकर

Amit Kulkarni

बाणावली धिरयोत बैल जखमी

Omkar B

काणकोणात दहावी परीक्षेचा पहिला दिवस सुरळीतपणे

tarunbharat

मुंबई विद्यापीठ घरोघरी पोहोचणार!

Amit Kulkarni

इथॅन वाझचा पश्चिम आशियाई बुद्धिबळमध्ये सुवर्णपदकांचा डबल धमाका

Amit Kulkarni

अळंब्यासारखे उमेदवार स्वतःच भाजप उमेदवारीची घोषणा करतात

Amit Kulkarni