Tarun Bharat

वर्षभरानंतर धावणार म्हैसूर-बेळगाव रेल्वे

Advertisements

बेळगाव : म्हैसूर ते बेळगाव यादरम्यान धावणारी विश्वमानव एक्स्प्रेस वर्षभरानतंर पुन्हा एकदा रुळावर येणार आहे. येत्या 10 एप्रिलपासून ही रेल्वे पूर्ववत होणार आहे. यामुळे बेळगाव-म्हैसूर यादरम्यान प्रवास करणाऱयांना सोयीचे ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून ही रेल्वे सुरू व्हावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात होती. अखेर ही मागणी मान्य झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

बेळगाव ते म्हैसूर असा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. तत्कालिन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून विश्वमानव एक्स्प्रेस सुरू झाली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच मार्च 2020 पासून बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव आता काहीसा कमी झाल्यानंतर ही रेल्वे पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात होती. रेल्वे मंत्रालयाने ही रेल्वे सुरू करण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेला पंधरादिवसांपूर्वी हिरवा कंदील दिला होता.त्यानंतर आता ही रेल्वे पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहे.

असे असणार वेळापत्रक

म्हैसूर-बेळगाव ही रेल्वे दि. 10 एप्रिलपासून धावणार आहे. पहाटे 5.50 वाजता ही रेल्वे म्हैसूर येथून निघून रात्री 9. 35 वा. बेळगावला पोहचेल. तर बेळगाव-म्हैसूर रेल्वे पहाटे 5.20 वाजता बेळगावमधून निघून रात्री 8.40 वाजता म्हैसूरला पोहोचणार आहे. यामुळे सकाळी लवकर निघून सायंकाळी म्हैसूरला नागरिकांना पोहोचता येणार आहे.

Related Stories

वजनात काटामारी, शेतकऱयांनी पाजविले पाणी

Amit Kulkarni

रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य

Amit Kulkarni

रेल्वेकडून संरक्षक कठडय़ाच्या कामाला सुरुवात

Amit Kulkarni

बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर तूर्तास लांबणीवर

Patil_p

आतापर्यंत सात हजार जणांची झाली स्वॅब तपासणी

Patil_p

खानापूर-अनमोड मार्गाचे काम ठेकेदाराकडून अर्धवट

Amit Kulkarni
error: Content is protected !!