Tarun Bharat

वर्षारंभालाच रेल्वे उशीरा

Advertisements

बेळगाव / प्रतिनिधी

वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेल्वे 7 तास उशीराने दाखल झाल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत होती. रेल्वे क्रमांक 22686 यशवंतपूर कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेस बुधवारी तब्बल 7 तास उशीराने धावत होती. याबरोबरच हजरत निजमुद्दीन ते वास्को धावणारी गोवा एक्स्प्रेस देखील दोन तास उशीराने बेळगावमध्ये दाखल झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. उत्तर भारतातून येणाऱया सर्वच रेल्वे. मागील दोन दिवसांपासून उशीराने धावत होत्या.

रेल्वे विभागाचे वेळापत्रक काही केल्या रूळावर येताना दिसत नाही. लांब पल्ल्याच्या गाडय़ा मागील दोन दिवसांपासून उशीराने धावत आहे. यामुळे नागरिकांना ताटकळत रेल्वे स्थानकावर बसण्याची वेळ आली आहे. चंदीगड ते यशवंतपूर दरम्यान धावणारी कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेस बेळगावमध्ये सायंकाळी 6.50 वाजता बेळगावमध्ये दाखल होते. परंतु ही रेल्वे मध्यरात्री 1 च्या सुमारास बेळगावमध्ये दाखल झाली.

रेल्वे क्र. 12780 ही निजामुद्दीन ते वास्को धावणारी रेल्वे रात्री 12.50 वा. बेळगावमध्ये दाखल होते. परंतु ही रेल्वे रात्री 2.30 वा. बेळगावमध्ये दाखल झाली. 2 तास उशीराने रेल्वे धावत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. याचबरोबर म्हैसूर ते बेळगाव विश्वमानव एक्स्प्रेसही 2 तास उशीराने धावत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

Related Stories

तरुणाची बेळगाव-नेपाळ-बेळगाव बाईकफेरी

Amit Kulkarni

एपीएमसी मार्केट वाचविण्यासाठी आता शेतकरी सरसावले

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ाची निकालात घसरण

Patil_p

एक्सेस इलाईट, सुपरएक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्स संघांची उपांत्य फेरीत धडक

Patil_p

भरधाव कारची दुचाकीला धडक

Rohan_P

रायगड मोहिमेसाठी हलगा येथील धारकरी सायकलवरून रवाना

Patil_p
error: Content is protected !!