Tarun Bharat

वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळून तिघांचा मृत्यू

पोलादपूर- कुडपण-धनगरवाडीनजीकची घटना, लग्न सोहळ्यातून परतताना दुर्घटना
25 जखमींना बाहेर काढण्यात यश, खेड-धनगरवाडीतील वऱ्हाड, रात्री उशिरापर्यंत मदतकर्त्यांचे बचावकार्य सुरूच

प्रतिनिधी / खेड, महाड

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हद्दीतील कुडपण-धनगरवाडीनजीकच्या वळणावर वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या 6 च्या सुमारास घडली. यात 34 जण जखमी झाल्याचे समजते. यातील 25 जखमींना बाहेर काढण्यात आले असून उर्वरित जखमींना बाहेर काढण्याचे मदतकार्य रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. हे वऱ्हाड तालुक्यातील खवटी-धनगरवाडी येथील असल्याची माहिती पुढे आली आहे.

तालुक्यातील खवटी-धनगरवाडी येथील वऱ्हाड पोलादपूर हद्दीतील कुडपण-धनगरवाडी येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. तो आटोपल्यानंतर हा ट्रक वऱ्हाडाला घेऊन येत होता. ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट दरीत कोसळला. कुडपण हे गाव दुर्गम भागात असल्याने अपघाताबाबत खबर मिळण्यास विलंब लागला. या मार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने पोलादपूर पोलिसांना कळवण्यात आले. पोलादपूर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. याशिवाय विविध मदतकर्त्यांनाही घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पोलादपूरसह खेडमधील मदतकर्ते तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

महाबळेश्वर ट्रेकर्स तातडीने घटनास्थळी पोहोचले

काळोखामुळे जखमींना बाहेर काढण्यात अडथळा

काळोखामुळे जखमींना बाहेर काढण्यात अडथळा निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत ट्रेकर्ससह मदतकर्त्यांचे बचावकार्य सुरूच हेते. या अपघातातील मृतांसह जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातातील जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश  

घटनास्थळी पोहोचलेल्या टेकर्सनी आतापर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. तसेच 34 जखमी झाले असल्याचे समजते. या ट्रकमधून सुमारे 100 वऱ्हाडी प्रवास करीत होते, अशी माहिती मिळाली आहे. पोलादपूर तालुक्यांतील प्रति महाबळेश्वर म्हणून प्रसिध्द असलेल्या निसर्गरम्य कुडपण गावापासून कांही अंतरावर असलेल्या क्षेत्रपाळ धनगरवाडीमध्ये शुक्रवारी लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी लग्नाचे वऱ्हाड खेड तालुक्यातील खवटी या गावाला जात असताना हा अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे मदतकार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर खेड महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, पोलादपूर महाड येथील मदतकार्य तातडीने रवाना झाले आहे. या टीममध्ये 70-80 स्वयंसेवक असल्याची माहिती मिळाली असून पोलीसही घटनास्थळी रवाना झाले आहेत. पुढील तपास सुरु आहे. जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

आंबेनळीतील दुर्घटनेची पुनरावृत्ती  

कुडपण हे पोलादपूर तालुक्यांचे शेवटचे ठिकाण असून अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ परिसर आहे. त्या ठिकाणी मदतकार्य पोहाचण्यास विलंब लागत आहे. हा अपघात घडल्यानंतर दोन वर्षापूर्वी आंबेनळी घाटांतील अपघाताची पुनरावृत्ती झाली असून मृतांचा आकडा वाढेल का, अशी भीती देखिल व्यक्त केली जात आहे.

नववर्षात अपघाताचे ग्रहण  
पोलादपूर तालुक्यांमध्ये नवीन वर्षाच्या सुरूवातीला अपघाताचे ग्रहण लागले असून काही दिवसापूर्वी लहूळसे गावांमध्ये वीज कोसळल्यामुळे चार घरांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सायंकाळी कुडपण गावाजवळ ट्रकला भीषण अपघात झाला.

Related Stories

जय भवानी युवक मंडळातर्फे जगदीश पाटील याला शुभेच्छा

Amit Kulkarni

मानवी कवटी-हाडे प्रयोगशाळेकडे

Amit Kulkarni

एकाच दिवसात 21 रुग्ण

NIKHIL_N

डॉ. रामण्णावर ट्रस्ट- कंकणवाडी आयुर्वेदीक कॉलेजतर्फे रक्तदान शिबिर

Amit Kulkarni

एल अँड टी कंपनीचे दुर्लक्ष ..!

Rohit Salunke

पाटबंधारे मेकॅनिकल कॉलनीतील दारे, खिडक्या जाऊ लागल्या चोरीला

Archana Banage