Tarun Bharat

वळिवामुळे ज्वारीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान

वार्ताहर / किणये

गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वळीव पावसामुळे तालुक्मयातील ज्वारी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्मयाच्या सर्रास भागातील शेतकरी ज्वारीचे उत्पादन घेतात. यंदाही ज्वारीचे पीक बऱयापैकी बहरून आले होते. मात्र पीक हातातोंडाला आलेल्या काळातच पावसामुळे ज्वारीची कणसे खराब झाली असल्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

आठ दिवसांमध्ये दोन वेळा वळीव पावसाने हजेरी लावली. यामुळे ज्वारीपिकासह भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. बहरून आलेली जोंधळय़ाची कणसे पावसामुळे भिजून ती काळपट झाली आहेत. आता ही कणसे खराब झाली असल्यामुळे उत्पादनात घट होणार आहे, याची चिंता शेतकरी वर्गाला लागून राहिलेली आहे.

नावगे, मच्छे, पिरनवाडी, बामणवाडी, जानेवाडी, येळ्ळूर, सुळगे, बस्तवाड, हालगा, किणये, कर्ले, बेळगुंदी, बहाद्दरवाडी आदी भागातील शिवारामध्ये ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे. रविवारी पहाटे व दुपारी मेघगर्जनेसह वादळी वाऱयाचा पाऊस झाला. या पावसात शिवारात असलेले ज्वारीचे पीक आडवे पडले. त्यामुळे रब्बीतील ज्वारीचा हंगाम यंदा वाया गेला, असे शेतकऱयांचे म्हणणे आहे.

काही शिवारामध्ये जोंधळय़ाची कणसे काढून कडबा कापून ठेवण्यात आलेला आहे. या कडब्याचा उपयोग शेतकरी जनावरांसाठी सुका चारा म्हणून वापरतात. मात्र तो कडबाही भिजला आहे. तसेच सध्यातरी ढगाळ वातावरणाचे संकट अद्याप आहेच, याची चिंताही बळीराजाला लागून राहिली आहे.

Related Stories

बसुर्ते फाटा-महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्त्याची दुर्दशा

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात शनिवारी 239 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Tousif Mujawar

देवबाग-सदाशिवगड येथील नृसिंह यात्रा 25 पासून

Amit Kulkarni

आम्हालाही जगू द्या;मजुरांची आर्त हाक

Amit Kulkarni

शाहूनगर परिसरात म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांचा प्रचारदौरा

Rohit Salunke

राजहंसगडावर पर्यटकांना प्रवेशबंदी

Amit Kulkarni
error: Content is protected !!