Tarun Bharat

वळीवडे गावातील पॉझिटिव्ह मयत रुग्ण महे गावात येऊन गेल्याने गाव तीन दिवस बंद

कसबा बीड/ प्रतिनिधी

महे तालुका करवीर येथे पॉझिटिव्ह रुग्ण येऊन गेल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वळीवडे आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह रुग्ण यांची तब्येत शुक्रवारपासून बिघडलेली होती. औषधोपचार घेऊन सदर व्यक्तीस थोडे बरे वाटल्यानंतर तो घरीच राहिला होता. महे गावातील त्यांचे मामा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या रक्षा विसर्जनासाठी वळीवडे गावातील त्यांचे नातेवाईक व स्वतः रविवारी महे गावात आले होते. रक्षाविसर्जन नंतर ते परत आपल्या वळीवडे गावाला गेले. त्या दिवशी त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर सोमवारी डी.वाय. पाटील हॉस्पिटल मध्ये स्वॅब देण्यासाठी गेले होते. त्यांचा रिपोर्ट बुधवारी रात्री दहा वाजता पॉझिटिव्ह आल्याने वळीवडे गावातील आरोग्य विभागाने तात्काळ भेट देऊन सदर व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी गेली होती त्या त्या ठिकाणी फोन द्वारे माहिती देऊन सतर्क राहण्यासाठी व तपासणी करण्यासाठी सांगितले आहे.   

सदर माहिती महे गावात समजल्यानंतर ग्रामपंचायत मार्फत अत्यावश्यक सेवा वगळता तात्काळ सर्व दुकाने बंद करून तीन दिवस लॉकडाऊन डाऊन  करण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षाविसर्जनास आलेल्या सर्व पाहुणे नातेवाईक व ग्रामस्थांनी तपासणीसाठी आरोग्य विभागामध्ये जावे व स्वतः होऊन जे जे संपर्कात आले आहेत. त्यांनी आरोग्य विभागास माहिती द्यावी असे आवाहन महे गावातील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

यावेळी आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवक गणेश पाटील, अर्चना खोत, सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका वृंदा कांबळे, उषा पाटील, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील इंदुमती सर्जेराव हुजरे, ग्रामपंचायत सरपंच कविता पाटील, उपसरपंच निवास पाटील सर्व सदस्य व कर्मचारी यांनी तळमळीने कोरोनाव्हायरस आपल्या गावांमध्ये संसर्ग होऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. महे गावातील रुग्णाच्या सानिध्यात आलेल्या 15 लोकांना तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले.

Related Stories

केएसएचे माजी अध्यक्ष सरदार मोमीन यांचे निधन

Archana Banage

वॉररुममुळे ४९०० रूग्णांना `जीवदान’

Archana Banage

गाव गाड्यातली खळ्यावरची मळणी कालबाह्य

Archana Banage

दीपावलीनिमित्त गांधीनगर बाजारपेठेत खरेदी-विक्रीसाठी गर्दी; उद्यापासून वाहतूक, पार्किंगमध्ये बदल

Archana Banage

आता पोलिसांची कानडी परेड; कर्नाटक सरकारचा महत्वाचा निर्णय

Archana Banage

कोल्हापूर : गांधीनगर बनतेय गुटखा विक्रीसाठीचं मुख्य केंद्र

Archana Banage