Tarun Bharat

वसंतगडच्या डेंगरावर दोन बिबटय़ांचे दर्शन

प्रतिनिधी/ उंब्रज

तळबीड (ता. कराड) येथील वसंतगड परिसरात असणाऱया झाडीत शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या युवकांना शनिवारी सायंकाळी दोन बिबटय़ाचे दर्शन झाले. युवकांनी मोबाईलवरुन या बिबटय़ांचे चित्रीकरण केले आहे. दरम्यान तळबीड येथे गेल्या पाच वर्षापासून बिबटय़ा व त्याच्या बछडय़ांचे वास्तव्य आहे. बिबटय़ाने अनेकदा पाळीव जणावरे, वासरू, रेडकू, कुत्रे, शेळ्यांवर हल्ले केले आहेत. दोन बिबटय़ांचे एकाच वेळी दर्शन झाल्याने ग्रामस्थांची पाचावर धारण बसली असून  वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी तळबीड ग्रामस्थांनी केली आहे.

      वसंतगडाच्या पायथ्याला वसलेल्या कराड तालुक्यातील तळबीड येथे बिबटय़ाची दहशत आहे. शनिवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास गावातील सागर पाडळे व अक्षय पाडळे हे दोन युवक शेळ्या चारुन घरी परतत होते. डोंगरावरुन गाली उतरत असतानाच गावच्या पश्चिमेला असणाऱया पाण्याच्या टाकी परिसरात बुरुजाजवळ एकापाठोपाठ दोन बिबटय़ाचे दर्शन या युवकांना झाले. या युवकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये याचे चित्रीकरण केले आहे. 

 वसंतगड परिसरात घनदाट झाडी आहे. या झाडीत बिबटय़ाचे वास्तव्य आहे. अनेकदा चंदगिरी डोंगर परिसर, पायथ्यालगत असणाऱया  शिवारात बिबटय़ा ग्रामस्थांनी पाहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थांना पुन्हा बिबटय़ाचे दर्शन होऊ लागले आहे. शेतवस्तीनजीक तसेच शिवारातून येजा करताना ग्रामस्थांना   बिबटय़ाचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. सहा महिन्यापूर्वी शिवारातील गायकवाड वस्तीतील शेतकऱयांचे जर्मन शेफर्ड जातीचे कुत्रे बिबटय़ाने फस्त केले होते. गावातील ऊस शेती व परिसरातील घनदाट झाडीमुळे सध्या येथे  बिबटय़ाचे वास्तव आहे. गतवर्षी 29 एप्रिलला माने वस्ती येथील घराशेजारील शिवाजी पवार यांच्या गोठय़ातील वासरु व एक पाळीव कुत्रे बिबटय़ाने फस्त केले. डोंगर परिसरात तसेच ओढा, झाडे व शेतात बिबटय़ाचा वावर आहे. तीन वर्षापूर्वी बिबटय़ाची मादी व तीन पिल्ले लोक वस्तीजवळ आलेली शेकडो ग्रामस्थांनी पाहिली. मात्र वनविभागाच्या अधिकाऱयांना आजपर्यंत त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. शेतकऱयांना शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी शिवारात जावे लागते, मात्र बिबटय़ाच्या भीतीने लोक शेतात जाणे टाळत आहेत.

परिसरात अनेकदा बिबटय़ा दिसला आहे. मागील वर्षभरात या डोंगर रांगेतील  चरेगाव, माजगाव, शिवडे, वराडे  येथील ग्रामस्थांना बिबटय़ाचे दर्शन झाले आहे. दीड वर्षापूर्वी  वसंतगडाच्या पायथ्याशी एक मृत अवस्थेत बिबटय़ा आढळून आला होता. याच डोंगराला जोडून असणाऱया वनवासमाची येथील डोंगर पायथ्यालगत तारेवर पडून बिबटय़ाचा मृत्यू झाला आहे. चोरजवाडी येथे जखमी अवस्थेत बिबटय़ा आढळून आला.

Related Stories

मुचंडी येथे शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Archana Banage

कुस्तीशौकिनांना हुरहूर राहुलच्या हुकलेल्या विजयाची

datta jadhav

वीज कनेक्शन कट कराल, तर जोड्याने मारू

Archana Banage

31 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Patil_p

सातारा : अवैध धंद्यांविरोधात बोरगाव पोलिसांची कारवाई

datta jadhav

हुश….आलं एकदाच जिहे- कठापुर चं पाणी नेर तलावात!

Patil_p