Tarun Bharat

वसती योजनांतून घरे मंजूर करा

जयभीम ओमसाई संघटनेचे निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरिबांना घरे द्यावीत, या मागणीसाठी जयभीम ओमसाई संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. गरीब कुटुंबांना घरे देण्याचे आश्वासन अनेकवेळा देण्यात आले. मात्र, अजूनही त्यांना घरे देण्यात आली नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून तातडीने घरे मंजूर करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. श्रीमंतांनाच विविध योजना दिल्या जात आहेत. पहिल्या ज्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या त्यामध्ये अनेकांची नावे आहेत. मात्र, त्यांना घरे देण्यात आली नाहीत. तेव्हा जे या योजनेस पात्र आहेत त्यांनाच घरे द्यावीत, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी राजू ठोंबरे, चरणसिंग धमुणे, अनिल ठोंबरे, राधा दुर्गाई, कलावती ठोंबरे, निलप्पा रंगापुरी, अनिता धमुणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.  

Related Stories

‘त्या’ अत्याचाराविरोधात महिला एकवटल्या

Patil_p

रविवारी बेळगाव जिल्हय़ात 319 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Tousif Mujawar

फायनान्स कंपनीचा रिकव्हरी कर्मचारी बेपत्ता

Amit Kulkarni

कुडचीत हायअलर्ट, प्रशासन दक्ष

Patil_p

बाळेकुंद्री खुर्द पाटील गल्लीत पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून

Amit Kulkarni

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कृषी पुरस्काराने गौरव

Amit Kulkarni
error: Content is protected !!