Tarun Bharat

वहागावात युवकाचा खून करून मृतदेह शेतात पुरला

वहागाव / वार्ताहर

वहागाव (ता. कराड) येथे युवकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह शेतात पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. खून झालेल्या युवकाचे नाव बरकत खुदबुद्दीन पटेल (वय 32, रा. वहागाव) असे असून या प्रकरणी संशयित गावातील एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बरकत पटेल हा 28 मे पासून बेपत्ता होता. त्या बाबतची फिर्याद त्याच्या कुटुंबीयांनी तळबीड पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. बरकत पटेल याचा गेल्या सहा दिवसांपासून शोध सुरू होता. याबाबत तपास सुरू असताना गावातीलच एका तरूणाने बरकत पटेल ज्या ठिकाणी काम करत होता, त्या मालकास बरकत पटेल याच्या फोनवरूनच बरकत दोन दिवस कामाला येणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी त्या तरूणास चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, संशयित तरूणाने आपल्या शेतातील 10 फुट ओढा दोन दिवसांपूर्वी जेसीबीने बुजवला होता. बरकत पटेल याच्या कुटुंबीयांच्या शंकेनुसार या ओढय़ात पोलिसांनी जीसीबीने उत्खनन केले असता बरकतचा मृतदेह आढळून आला. खुनाचे कारण अस्पष्ट असून सदरच्या घटनेची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरा तळबीड पोलीस स्टेशनला सुरू होती. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, तहसीलदार विजय पवार, तळबीड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील, मंडलाधिकारी महेश पाटील यांनी भेट दिली.

शुक्रवारी सायंकाळपासून वहागावातील गडोख पेशर रोडवरील संशयिताच्या शेतालगतच्या ओढय़ात जेसीबीच्या साहाय्याने उकरण्यात येते होते. सायंकाळी सातच्या सुमारास मृतदेह सापडला. त्यानंतर तो रूग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. गावात सन्नाटा पसरला होता.

Related Stories

छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नुतनीकरणासाठी १६ कोटी मंजूर

Archana Banage

चंदन चोरांची टोळी गजाआड

datta jadhav

मराठा आरक्षण रद्द झाल्याबाबत राजधानीतून तीव्र संताप

Patil_p

चांगला तपास करा, अन्यथा तुमची चौकशी लावतो

Patil_p

जिल्ह्यात बाधितांची वाटचाल हजाराकडे

Archana Banage

दळणवळणाअभावी डालग्यातच सोडला प्राण

datta jadhav