Tarun Bharat

वाईच्या गर्ल्स हायस्कूलची इमारत पाडल्याप्रकरणी न्यायालयातून दरोडय़ाचा गुन्हा

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

वाई येथील रविवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलची इमारत पडल्या प्रकरणी ब्राह्मो समाजाच्या अध्यक्ष मीनल राजेंद्र साबळे व राजेंद्र सर्जेराव साबळे या दोघांच्यावर वाई पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला आहे, याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे हे करत आहेत. दरम्यान, हे प्रकरण गुन्हा दाखल झाल्यामुळे आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रेखा ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवार पेठ येथे असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूल च्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मीनल राजेंद्र साबळे (वय 45), राजेंद्र सर्जेराव साबळे (वय 52 दोघे रा. रिमझिम बांगला पवई नाका सातारा) यांनी संगनमताने दरोडा टाकून शाळेतील दहा संगणक एक प्रिंटर महत्त्वाची कागदपत्र शाळेचे रेकॉर्ड विद्यार्थ्यांची कागदपत्र रजिस्टर लाकडी टेबल-खुर्च्या असा एक लाख दहा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेऊन नुकसान करून मुख्याध्यापक रेखा ठोंबरे यांना शिवीगाळ दमदाटी केली याची तक्रार त्यांनी वाई न्यायालयात दि. 17 फेब्रुवारी रोजी दाखल केली. त्यावरून वाई पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास वाई पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र तेलतुंबडे हे करत आहेत.

Related Stories

उपोषणाचा इशारा अन् १.५५ कोटी जमा

datta jadhav

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ‘मविआ’ची भाजपला आॅफर

Archana Banage

परमबीर सिंग यांच्याकडून अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी

Archana Banage

महाराष्ट्र पोलीस दलावर अविश्वास चुकीचा

Patil_p

राजवाडा परिसरात वडाप चालकास चोप

Patil_p

सातारा : वीज बिल वसुलीवरुन उंब्रजला स्वाभिमानीचा रास्तारोको

datta jadhav
error: Content is protected !!