Tarun Bharat

वाईतील पाणी पुरवठा योजनेसाठी 35 कोटी

प्रतिनिधी/ वाई

वाई शहरासाठी सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

वाई येथे आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, नगराध्यक्ष अनिल सावंत, जि. प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, वाई शहराचा विस्तार लक्षात घेता आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. वाई, महाबळेश्वर, खंडाळा, लोणंद, पाचगणीतील विविध सुविधासाठी 10 कोटी रुपये देण्यात येतील. वाई शहरातील भूमिगत गटार योजनेबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. कृष्णा घाट विकास आणि नदी सुधार योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत होणाऱया बैठकीत सुरुर-पोलादपूर राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून समावे करण्याबाबत विनंती करण्यात येईल. भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन डिसेंबरपर्यंत चार पदरी पुलाचा प्रस्ताव सादर करावा, येत्या अंदाजपत्रकात त्यासाठी मान्यता देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

कोविड योद्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मानव जातीवर कोविडचे संकट आले असताना नागरिकांचा जीव वाचविण्याला या योद्यांनी प्राधान्य दिले. त्यांनी खऱया अर्थाने मानवसेवेचे कार्य केले. वाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यास कुठलीही कमतरता भासू देणार नाही. कोरोना काळात सभापती रामराजे नाईक-निंबाळकर,आमदार मकरंद पाटील यांनी सेवा भावनेने कार्य केले.

चौकट

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, बाहेरील जिह्यातील नागरिक वाई येथे येतात. ही सांस्कृतिक नगरी असल्याने पुलाचे बांधकाम करताना त्याचे जुने सौंदर्य कायम ठेवण्यात येत आहे. मुलांसाठी शाळेच्या चांगल्या इमारती उभ्या राहणार आहेत. कोविड काळात आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्यात आल्याने विकासासाठी निधीची कमतरता भासत होती. मात्र आता जिल्हा नियोजन समिती आणि शासनाच्या माध्यमातून विकासाला वेग देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार मकरंद पाटील यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

Related Stories

पाचशे कोटी द्या, अन्यथा डाटा नष्ट करू

Archana Banage

राजमातांनी शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे स्ट्रप्चर उभारण्यासाठी चर्चा करुन केली पाहणी

Amit Kulkarni

केरळहून आलेल्या शिवभक्ताचे शिवतीर्थवर जंगी स्वागत

Patil_p

प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये

Archana Banage

बायोमायनिंग प्रकरणी राजू गोरे करणार आज उपोषण

Patil_p

सातारा : फलटणच्या युवकाचा हनी ट्रॅप

Archana Banage