Tarun Bharat

वाईत चोरटय़ांचा धुमाकूळ ; सहा दुकाने फोडली..

Advertisements

प्रतिनिधी/ वाई

येथील भाजी मंडई परिसरात असलेला एक बिअर बार, मेडिकल,  खताचे व किराणा मालाचे दुकान तसेच एक दूध डेअरी अशी पाच दुकाने चोरटय़ांनी सोमवारी रात्री फोडून अंदाजे  पन्नास हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. अनेक महिन्यानंतर वाईत एकाच वेळी दुकाने फोडल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन  सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे.चोवीस तासात चोरटय़ांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

           भाजी मंडईत असलेला शशिकांत येवले यांच्या मालकीचा आम्रपाली बिअर बार अँड रेस्टॉरंट चे मुख्य शटर चोरटय़ांनी कटावणीच्या साह्याने उचकटून आत प्रवेश करून गल्ल्यात असलेले 14  हजार 200 रुपये व दोन दारूचे खंबे लंपास केले. चोरटय़ांनी बार लगत असणाया सुशांत गोळे यांच्या मालकीचे  साईकृपा कृषी केंद्र या खताच्या दुकानाचेही शटर उचकटून दुकानात ठेवलेली 18 हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच बिलाल इकबाल बागवान यांच्या ही किराणामाल दुकानाचे शटर उचकटून चोरटय़ांनी 11 हजार रुपये रोख रक्कम गायब केली आहे. तसेच यात्री निवासाच्या समोर असलेल्या श्रीपाद मेडिकल चे शटर उचकटून चोरटय़ांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना याठिकाणी काही मिळून आले नाही. मात्र महागणपती पुलाजवळ असणाया अष्टविनायक फार्मा या मेडिकलचे शटर उचकटून 7 हजार रुपयांची रोकड लंपास केली.  यात्री निवास मध्ये असलेली रामचंद्र भाटे  यांच्या भाटे डेअरीचे ही शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चोरटय़ानी 300 रुपये रोख व अठराशे रुपये किंमतीचे आईसक्रीचे बॉक्स चोरून नेले. चोरटय़ांनी रात्री साडे दहा ते साडे बाराच्या दरम्यान ही सर्व दुकाने फोडल्याची माहिती समोर येत आहे. श्रीपाद मेडिकल मध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये चोरटे शटर उघडून आत प्रवेश करतांना दिसत आहेत. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी गुरेबाजार झोपडपट्टी मध्ये राहणाया चार संशयित तरुणांना सकाळीच चौकशी साठी ताब्यात घेतले होते. तपासात त्यापैकी सनी सुरेश जाधव (वय 26 ), अक्षय गोरख माळी ( वय 20 ) आणि सागर सुरेश जाधव ( वय 24 ) सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी ,वाई या तिघांनी दुकाने फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 17 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. अवघ्या चोवीस तासात डीबी पथकाने चोरटय़ांना पकडण्यात यश मिळवले आहे. अटक केलेले चोरटे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाई पोलिस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

खात्यांतर्गत पी एस आय 2016 मधील उमेदवारांना त्वरित सामावून घ्या

Abhijeet Shinde

कर्नाटकचा मुंबईवर हक्क हास्यास्पद

Abhijeet Shinde

Karnatak : काँग्रेसचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे निर्देश

Archana Banage

पीएम मोदींच्या सीएम ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाले..

Abhijeet Shinde

शिरोळमध्ये दररोज 400 निराधारांना जेवणाची सोय

Abhijeet Shinde

‘त्या’ 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन

datta jadhav
error: Content is protected !!