आगाराला दर तीन दिवसाला एक टँकर डिझेल लागते.मात्र, तीन दिवसांनी येणारा टँकर न आल्याने डिझेलचा तुटवडा जाणवला असल्याने अनेक गाडय़ा रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. वाई आगारच्या प्रशासनाच्या गचाळपणाचा फटका प्रवाशाना सुरू झाला आहे. लॉक डाऊननंतर नव्या उमेदीने वाई आगार कामाला लागले.मात्र,वाई आगारातील काही कर्मचायांना काम चुकारपणामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.वाई आगारचा त्यातील एक प्रकार म्हणजे दर तीन दिवसाला एक टँकर लागतो.हा टँकर गेल्या तीन दिवसांपासून न आल्याने आज काही फेया रद्द करण्यात आल्या.त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले.दरम्यान, दररोज होत असलेल्या गैरसोयीबाबत वाई प्रवाशी संघटनेने वाईचे आगार प्रमुख गणेश कोळी यांच्याकडे तक्रारीचा पाढा मांडला तरीही सुधारणा झाली नाही असे ही प्रवाशांनी सांगितले.


previous post