Tarun Bharat

वाई तालुक्यात नव्याने 81 जण बाधित

शहरात 17 जण बाधित

प्रतिनिधी/ वाई

वाई शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा अक्षरशः कहर सुरू आहे.दररोज नवनवीन रुग्ण आढळून येत आहेत.असे असताना नियम न पाळणाया नागरिकांवर कारवाई करण्यासाठी वाई पालिका झोपी गेलेली आहे.वाई पोलीस ऍक्टिव्ह झाले असून गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे. व्यापायांच्यावर ही त्यांनी कारवाई केली.दरम्यान, गणपती घाट परिसरात एका मालिकेचे चित्रीकरण सुरू होते.सोशल डिस्टनन्सचा फज्जा उडाल्याचे दिसत होते.वाई तालुक्यातील नव्याने 81 जण बाधित आढळुन आले आहेत.

वाई शहरात दररोज नवनवीन कोरोना बाधित आढळून येत आहेत.कोरोनाच्या विळख्यात गावेच्या गावे होरपळत आहेत.प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.मृत्यू दर वाढत आहे.असे असताना वाई शहरात कोरोनाला अटकाव करण्यासाठी पालिका भरारी पथके निद्रिस्त झालेली आहेत.वाई पोलीस गेल्या दोन दिवसांपासून ऍक्टिव्ह झाले आहेत.वाईच्या गणपती घाटावर रविवारी एका मालिकेचे चित्रीकरण सुरू होते.वास्तविक मंदिर बंद असताना प्रशासन नेमके या चित्रीकरणास कशी परवानगी देत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.चित्रीकरण दरम्यान सोशल डिस्टनन्सचा फज्जा उडत होता.वाई तालुक्यातील वाई 1,  वाई शहरातील गंगापुरी 4, रविवार पेठ 1, मधली आळी 1, यशवंतनगर 2, सह्याद्रीनगर 2, फुलेनगर 1, गणपती आळी 1, रामडोह आळी 1, सोनगिरवाडी 3, अमतृवाडी 1, धर्मपुरी 3,ओझर्डे 7, शेंदूरजणे 1,  पांडेवाडी 5, विराटनगर 1, कवठे 5,  कन्हुर 7, व्याजवाडी 1, चिखली 3, पसरणी 2, भुईंज 7, कलंगवाडी 3, उडतारे 3, जांभ 2, देगाव 1, विरमाडे 1, कुसळे 1, बोपेगाव 1, केंजळ 2, पाचवड 1, किकली 1,  संनगर आळी वाई 2, लखननगर 1, शिरगाव 2, पाचवड 1 असे बाधित आढळून आले.

Related Stories

नागठाणे येथील फिरस्ते परप्रांतीयांना मदतीचा हात

Patil_p

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात मटका जोमात

Patil_p

काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Archana Banage

”अजितदादा… जरा सांभाळून बोला, आम्ही फाटक्या तोंडाचे , बोलायला लागलो तर महागात पडेल”; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

Archana Banage

शाहू विचार जागर यात्रा बहुजनांसाठी दिशादर्शक : श्रीमंत शाहू छत्रपती

Abhijeet Khandekar

जिल्हय़ात कडक लॉकडाऊनसाठी प्रशासन सज्ज

Patil_p