Tarun Bharat

वाकेश्वर- भुरकवडीत हवाई सर्वेक्षण : ड्रोनच्या सहाय्याने पथदर्शी प्रयोग

प्रतिनिधी / वडूज

खटाव तालुक्यातील वाकेश्वर, भुरकवडी या दोन गावातील मिळकतींचे हवाई सर्वेक्षण करण्यात आले. ड्रोन कॅमेर्‍याच्या सहाय्याने केलेला जिल्ह्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग राबविण्यात आला.

वाकेश्वर येथील शुभारंभ प्रसंगी भूमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक अनिल लोखंडे, वडूजचे उपअधिक्षक कृष्रा सांगवीकर, कराडचे भूमि अभिलेख अधिकारी बाळासाहेब भोसले, सातारचे प्रवीण पवार, कोरेगांवचे डॉ. शैलेश साठे, मेढ्याचे तुषार पाटील, सातारचे नगरभूमापन अधिकारी किरण नाईक, शिल्पा जवळ व वडूज विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

यासंदर्भात माहिती देताना सांगवीकर यांनी सांगितले की, ड्रोन कॅमेर्‍याच्या सहाय्याने मोजणी करण्याचा हा पथदर्शी प्रयोग आहे. या माध्यमातून गावातील पक्की घरे, छपरे, मोकळी जागा, रस्ते यांची मोजणी होणार आहे. प्रत्येक मिळकतधारकाला एक प्रोपर्टी कार्ड मिळणार आहे. या कार्डाचा उपयोग खरेदी-विक्री व्यवहार तसेच बँक कर्जासाठी होवू शकतो. यावेळी सरपंच प्रतिनिधी नामदेव फडतरे, माजी उपसरपंच अनिल कचरे, दत्तात्रय फडतरे, ग्रामसेवक सोमनाथ सावंत, बाबा फडतरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात मटका जोमात

Patil_p

सातारा : शोरूम मधील दुचाकी चोरी प्रकरणी एकास अटक

Archana Banage

बाधित वाढीचा वेग कायम : 2,364 बाधित

datta jadhav

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रेड सेपरेटरच्या द्वारांना येणार झळाळी

Abhijeet Khandekar

गोकुळमध्ये सत्तांतर होणार!… तर आमची खा. मंडलिक यांच्यासोबत युतीची तयारी, खासदार धनंजय महाडिकांचा राजकीय बॉन्सर

Rahul Gadkar

साताऱयातील तेराशे कामगारांसह रेल्वे रवाना

Patil_p