Tarun Bharat

वागदे ग्रामसेवकांची बदली रद्द करण्यात यावी

वागदे सरपंच, उपसरपंचसहित ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी

कणकवली / प्रतिनिधी-

वागदे येथील ग्रामसेवक ऋतुराज कदम यांच्याकडून विनंती बदलीचा अर्ज घेऊन त्यांची बदली करण्यात आली. नियमानुसार ते बदलीस पात्र नसताना करण्यात आलेली ही बदली रद्द करण्यात यावी, तसेच त्यांना वागदे येथे तात्काळ रुजू करण्यात यावे, अशी मागणी वागदे सरपंच, उपसरपंचसहित ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.


वागदे सरपंच पूजा घाडीगावकर, उपसरपंच रुपेश आमडोस्कर, माजी उपसरपंच संतोष गावडे, रवींद्र गावडे शिशिर घाडीगावकर, ललित घाडीगावकर, पंढरीनाथ कदम, सुषमा गोसावी, शरद सरंगले, अमित घाडीगावकर, गणपत घाडीगावकर दीपक गोसावी, मंगेश घाडीगावकर, संदीप घाडीगावकर व इतर उपस्थित होते.


वागदे ग्रामसेवकांची बदली करताना तेथील पदभार लगतच्या ग्रामसेवक न देता कुंभवडे ग्रामसेवक यांच्याकडे देण्यात आला. वास्तविक वागदे ग्रामसेवक बदलीसाठी अद्याप प्रशासकीय दृष्ट्या पात्र नव्हते. मात्र त्यांच्याकडून बदली अर्ज घेऊन ही बदली करण्यात आली आहे. त्यामुळे ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी वरिष्ठांकडे कळवून उचित कार्यवाही केली जाईल असे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

वृक्ष कोसळल्याचा दूरध्वनी खणखणला अन्…

Patil_p

रत्नागिरी : आता माशांसाठीही रोगप्रतिकारक लस

Archana Banage

जिल्हा न्यायालयाच्या नियमित कामकाजास आजपासून सुरूवात

Patil_p

मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटात कंटेनर पलटी

Archana Banage

साखरप्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ

Patil_p

शॉर्टसर्किटमुळे घराला आग, लाखो रुपयांचे नुकसान

Patil_p