Tarun Bharat

वाघनख्याचा अलंकार बनेल गळ्यातला फास…

Advertisements


बेकायदेशीर वाघनख्यांच्या वापरावर वन विभागाची नजर

सुधाकर काशीद/कोल्हापूर

गळ्यात सोन्याच्या साखळीत लटकवलेले वाघनख हा एक वेगळा अलंकार म्हणून जरूर सुंदर दिसतो. पण गळ्यातल्या वाघ नख्यांचा हा अलंकार वन अधिकाऱयांच्या नजरेस पडला तर तर मात्र तो कारवाईसाठी फास ठरू शकतो.

अर्थात कोल्हापूर परिसरात अनेक जणांच्या गळ्यात वाघ नख्याचा हा अलंकार आहे. कारवाई होत नाही तोवर हा अलंकार म्हणून गळ्यात ठीक आहे, पण भुदरगड तालुक्यात शिवडाव येथे चार दिवसांपूर्वी सापडलेल्या वाघ नखाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने आता वाघनख्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. कारण वाघाची शिकार केल्याशिवाय वाघाचे नखच मिळत नाही, हे भीषण वास्तव आहे.

गळ्यात सोन्याच्या साखळीत वाघ नख हा पारंपरिक अलंकार आहे. अर्थात ज्या काळात शिकारीला मुभा होती त्या काळात ठीक आहे. कारण ज्यांनी अधिकृत शिकारी केल्या, त्यांनी त्या शिकारीतील प्राण्यांची डोके, कातडे, दात, शिंगे किंवा शिकारीतील प्राण्यांचे शरीर भाता भरून ठेवले आहे व त्याची नोंद 2003 पूर्वी वन विभागाकडे केली आहे. त्यांना ते नोंद असलेले वाघनख अलंकारात किंवा घरात बाळगण्याची मुभा आहे. पण बेकायदेशीर शिकारीतील तस्कराकडून वाघनखे घेऊन त्याचा अलंकार म्हणून वापर करणे वन कायद्यानुसार मोठा गंभीर गुन्हा आहे. असे बेकायदेशीर वाघनख घेऊन त्याचा अलंकार बनवून देणे हा सराफांच्या दृष्टीने गुन्हा आहे.

बेकायदेशीर वाघ नखे बाळगणे, त्याचा अलंकार करणे हा गुन्हा असला तरीही ते वापरणारे अनेक शौकीन कोल्हापुरात आहेत. आपण किती गंभीर गुन्हा किती सहजपणे करतो आहे याची त्यांना कल्पना नाही. किंवा असली तरी `त्याला काय हुतंय’ या विचार शैलीमुळे ते घाबरत नाहीत. या वाघ नख्यांना खूप किंमत आहे. त्यामुळे बिबटÎा, वाघाची शिकार करणाऱया तस्करांच्या काही टोळ्या आहेत. वाड वडिलार्जित किंवा खंडेनवमीला देव्हाऱयातील पूजेच्या बंदुका म्हणून त्यांनी आपल्याकडे बंदुका बाळगल्या आहेत.

चार दिवसांपूर्वी सापडलेली वाघनखे अगदी ताजी आहेत. वाघाच्या खुरासहीत सापडलेले आहेत. त्यामुळे कोठेतरी वाघाची शिकार करूनच वाघनखे काढली गेली असण्याची शक्यता आहे. करतात ते तपासात स्पष्ट होऊ शकणार आहे. मात्र या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे वाघ नखाचा अलंकार गळ्यात घालून फिरणाऱयांना मोठा इशारा मिळालेला आहे.

वन्य प्राण्यांचे अवयव बाळगणे हा गंभीर गुन्हा

वाघाचे नखच काय, वन्यप्राण्यांच्या कोणत्याही अवयवाला कोणालाही जवळ बाळगता येत नाही. पूर्वीच्या काळी शिकारीवर निर्बंध नव्हते. त्यावेळची गोष्ट वेगळी आहे. पण पूर्वी शिकार करून ज्यांनी किंवा किंवा वाड वडिलार्जित घरात असलेल्या शिकारीतील जनावरांची डोकी, शिंगे, दात, नखे, कातडे याच्या नोंदी 2003 सालापर्यंत झाल्या आहेत. त्यानंतर अशा नोंदी बंद झाल्या आहेत. त्यामुळे नोंद नसलेले वन्य प्राण्यांचे अवयव बाळगणे हा गंभीर गुन्हा असणार आहे.
क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक

सराफ व्यावसायिक शक्यतो अशा व्यवहारापासून लांबच
वाघ नखाचा अलंकार करून घेण्यासाठी कोणी आल्यास पूर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना आम्ही सराफ व्यावसायिकांना दिल्या आहेत. त्यामुळे कोणीही सराफ अशा गुह्यापासून लांब राहील, अशी खबरदारी घेतो आहे. तरीही अनेक वाघनख अलंकार काहीजण करून देतात. पण 95 टक्के ती वाघनखे बनावट असतात. वाघ नखासारख्या दिसणाऱया घटकाला तसा आकार दिलेला असतो. व वाघ नखे म्हणून तो काही तस्करांनी विकलेला असतो. आम्ही सराफ व्यावसायिक शक्यतो अशा व्यवहारापासून लांबच राहतो.

कुलदीप गायकवाड-अध्यक्ष कोल्हापूर सराफ व्यापारी संघ

Related Stories

काँग्रेसच्या नाराज गटात पी. एन.पाटील, राजूबाबा आवळे

Abhijeet Khandekar

स्वाभिमानाचे शेतकरी संघटनेचे 21 जुलै रोजी राज्यव्यापी दूध बंद आंदोलन

Archana Banage

देशाची घटना-सार्वभौमत्व धोक्यात – दिग्विजय सिंह

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात ७८३ नवे रुग्ण, १७ जणांचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : मोहरेत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णावर अत्यसंस्कार, भय कमी करण्यासाठी प्रयत्न

Archana Banage

शिराळा येथे महावितरणाच्या कार्यालयाला शेतकरी आणि महीलांनी ठोकले टाळे

Archana Banage
error: Content is protected !!