Tarun Bharat

वाघाच्या मृत्यूनंतर वनखात्याची यंत्रणा टार्गेट

Advertisements

उदय सावंत / वाळपई :

सत्तरी तालुक्मयातील गोळावली भागांमध्ये चार वाघांचा मृत्यू झाल्यानंतर आता मिळवलेल्या माहितीनुसार वनखाते व म्हादई अभयारण्याचे व्यवस्थापन टार्गेट होऊ लागले आहे. वेगवेगळय़ा संस्थांनी आतापर्यंत या वाघांच्या मृत्यूला पूर्णपणे सरकारची वनखात्याची यंत्रणा जबाबदार असल्यामुळे हा प्रकार घडला अशाप्रकारचे आरोप होऊ लागलेले आहे. यामुळे आता सात पैकी शिल्लक राहिलेल्या तीन वाघ संवर्धन करण्याची जबाबदारी पूर्णपणे वनखात्याचे यंत्रणेवर आली आहे. सध्यातरी या यंत्रणेकडे वाघ संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्रकारची यंत्रणा कार्यरत नाही. अन्यथा यापूर्वीच वाघांचे रक्षण व संवर्धन झाले असते अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

वाळपई मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या गट समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत वाघांच्या मृत्यूला पूर्णपणे वनखात्याची यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. गट समितीचे अध्यक्ष दशरथ मांदेकर, महिला अध्यक्ष रोशन देसाई, सरचिटणीस नंदकुमार कोपर्डेकर व इतरांनी यासंदर्भात समितीचे म्हणणे मांडत असताना गेल्या अनेक वर्षापासून धनगर बांधवांच्या कुटुंबियांना भीतीच्या छायेखाली केवळ या वाघांच्या संदर्भात वनखात्याने उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज चार वाघांचा मृत्यू झाला. यामध्ये निसर्गाचा पुजारी म्हणून ओळखल्या जाणाऱया गवळी समाजावर याचा आरोप आला आहे. आज या कुटुंबातील पाच जणांना अटक केली असून त्यांची परिस्थिती पूर्णपणे गंभीर स्वरूपाची झाली आहे.

धनगर समाज संघटनेची मागणी

गोवा धनगर समाज सेवा संघ सत्तरी या संस्थेनेही त्याला पूर्णपणे वनखात्याची यंत्रणा जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या पद्धतीने पावणे कुटुंबीय अनेक प्रकारच्या गंभीर समस्यांना तोंड देत आपले जीवन व्यथित करीत आहे ते पाहिल्यास सरकारची जबाबदारी निश्चितपणे आहे. यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते मात्र 1961 सालापासून ते आतापर्यंत या कुटुंबियाच्या साधनसुविधाकडे सरकारी यंत्रणेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या समस्यांच्या माध्यमातून सत्तरी तालुक्मयातील धनगर समाज बांधव पूर्णपणे असुरक्षित झाले असून या कुटुंबीयांना सरकारने पाठबळ द्यावे अशा प्रकारची मागणी समाज संघटनेच्या माध्यमातून केली आहे.

Related Stories

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते संजीव वेरेंकर यांची आज मुलाखत

Amit Kulkarni

रेव्ह पार्टी आयोजनातील दोषींवर कारवाई करावी

Omkar B

‘एकदा काय झालं’: कथांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधण्याची अनोखी पद्धत

Amit Kulkarni

भाजपचे बहुतांश उमेदवार निश्चित

Amit Kulkarni

नव्या नेतृत्वाखाली काँग्रेस गुरुडझेप घेईल

Amit Kulkarni

म्हापशात शेतकरीबंधूतर्फे निषेध

Patil_p
error: Content is protected !!