Tarun Bharat

वाघुर्डे ते नवलेवाडी दरम्यानचा रस्ता देतोय अपघातास निमंत्रण

सुरक्षा उपाय योजनांचा अभाव, अधिकारी ठेकेदाराचे दुर्लक्ष, जनतेतून संताप

प्रतिनिधी / म्हासुर्ली

धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्ग असलेल्या कळे- म्हासुर्ली या प्रमुख मार्गावरील वाघुर्डे ते नवलेवाडी ता.पन्हाळा दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराने वाहतूकीच्या दृष्टी योग्य उपया योजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवासी जनतेसाठी रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याने संताप व्यक्त होत आहे.

कळे (ता.पन्हाळा) ते म्हासुर्ली (ता.राधानगरी) हा धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्ग असून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते असल्याने सततची वर्दळ असते. याचीच दखल शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेत वाघुर्डे ते नवलेवाडी गावांच्या दरम्यान रस्ता रुंदीकरण डांबरीकरणाचे काम सुरू केली आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नवीन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खुदाई करण्याचे काम करण्यात आले आहे.मात्र संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदाराने प्रवाशी जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाय योजना केल्या नसल्याने सदर रस्ता अपघातास निमंत्रण देणार ठरत आहे.

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही ठिकाणी खोल खुदाई करण्यात आली आहे. मात्र सुरक्षेच्यादृष्टीने रिफ्लेक्टर फित अथवा सूचना फलक लावलेले नाहीत.परिणामी या ठिकाणाहून रात्री प्रवास करताना जीव मूठीत घेऊन जावे लागत आहे.तसेच सध्या ऊस तोडणी हंगाम सुरु असल्याने ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर व इतर वाहनांना येथील रस्त्याचा अंदाज येत नसल्याने मोठा अनर्थ घडण्याची भिती जनतेतून व्यक्त होत आहे. या मार्गावरून रात्री व पहाटे शहरात कामासाठी जाणारे अनेक चाकरमानी युवक ही प्रवास करत असल्याने त्यांयांची सुरक्षा ही धोक्यात आली आहे. मात्र या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराचे दुर्लक्ष केल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. तरी सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.

Related Stories

केएमटी बस सेवा सुरू करा; मौजे वडगाव ग्रामस्थांनी रोखला रस्ता

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लॅंटच `ऑक्सिजन’वर !

Archana Banage

पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री उद्या अर्ज दाखल करणार

Abhijeet Khandekar

कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

Archana Banage

यमाच्या प्रतिकृतीतून कोरोना प्रतिबंधाचा संदेश

Archana Banage

जिल्ह्यात दुपारी बारा पर्यंत १७ पॉझिटिव्ह तर १ मृत्यू

Archana Banage