Tarun Bharat

वाघुर्डे येथे दोन लहान मुलांना तर पणोरेतील महिलेला कोरोनाची लागण

सुळे /प्रतिनिधी

धामणी परिसरात आज कोरोनाचे नवीन तीन रूग्ण आढळून आले. यामध्ये वाघुर्डे येथील दोन लहान मुलांचा तर पणोरे येथील एका महिलेचा समावेश आहे. धामणी परिसरात तब्बल दोन महिन्यानंतर कोरोना पेशंट आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सर्व रुग्ण पन्हाळा येथील कोवीड सेंटरमध्ये क्वारंटाईन होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोकुळ शिरगाव येथे स्थायिक असलेली एक व्यक्ती वाघुर्डे येथे आपल्या भावाकडे आठवड्याभरापूर्वी येऊन गेली होती. त्यानंतर सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली होती. यामुळे वाघुर्डे येथील त्या व्यक्तीच्या भावासह सर्व कुटुंबाला पन्हाळा येथील कोवीड सेंटरमध्ये चार दिवसापूर्वी क्वारंटाईन केले होते. व त्याचा स्लॅब घेतला होता. आज सकाळी त्या कुंटूबातील दोन लहान मुलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच पणोरे येथील एक महिला चार दिवसा पूर्वी आपल्या कुटंबासमवेत आपल्या मांडूकली ता. गगनबाबडा येथील नातेवाईकाच्या आंत्यविधीसाठी गेल्या होत्या. सदर मृत व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या कुटूंबाला देखील पन्हाळा येथे क्वारंटाईन केले होते. आज सकाळी त्यातील एका पन्नास वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Related Stories

‘इचलकरंजी’ नंतरही दूधगंगेत अर्धा टीएमसी पाणी

Archana Banage

Kolhapur : शेत मजूर महिलेचा गळा चिरून खून; मौजे वडगाव येथील घटना

Abhijeet Khandekar

नूर ए रसुल फौंडेशनचे काम सामाजिक बांधिलकी जपणारे – मंत्री यड्रावकर

Archana Banage

पदवीधरांच्या प्रश्नासाठी भाजपाचे उमेदवार एकजुटीने काम करतील

Tousif Mujawar

कराड आगारात ‘वरून कीर्तन… आतून तमाशा’

Patil_p

ठोसेघर पठार भागातील बत्ती गुल

Patil_p