Tarun Bharat

वाघुर्मे येथील सरकारी विद्यालयाचे नुतनीकरणाला प्रारंभ

पालक शिक्षक संघटनेतर्फे अभिनंदन

वार्ताहर / सावईवेरे

प्रियोळ मतदारसंघातील वेरे वाघुर्मे ग्रामपंचायत क्षेत्रातील वाघुर्मे गावातील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याने येथील पालक शिक्षक संघटनेतर्फे सरकारचे अभिनंदन केले आहे.

  सदर इमारत गोवा मुक्तिनंतर बांधण्यात आली होती. या विद्यालयात शिक्षण खात्यातर्फे सुरवातीपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सातवीपर्यंतचे शिक्षण प्राप्त करणे सोपे जात होते पण त्यानंतर गोव्यात इंग्रजीचे प्रस्त वाढल्याने पाचवी ते सातवी पर्यंतचे वर्ग पट संख्याविना बंद पडले व बहुतेक विद्यार्थी व सावईवेरे किंवा खांडेपार येथील इंग्रजी विद्यालयात जाऊ लागले. सदर इमारत चार खोल्याची असून तिचे नुतनीकरण होणे आवश्यक होते. प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांच्या प्रयत्नातून प्रियोळ मतदारसंघातील बऱयाच शाळाचे नुतनीकरणाचे काम मार्गी लागले आहे. या इमारतीचे काम मार्गी लागावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले असून सध्या त्या कामास प्रारंभ झाला आहे.

Related Stories

अनियमित कदंब बसमुळे सुर्लातील विद्यार्थ्यांची गैरसोय

Amit Kulkarni

बारा आमदार अपात्रता याचिकेवर निवाडा आज

Amit Kulkarni

मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण होता कामा नये

Omkar B

बाये लक्ष्मी नारायण नूतन मंदिराचा 25, 26 रोजी वर्धापनदिन

Patil_p

जानेवारीपासून चार्टर विमाने सुरु करा

Patil_p

सत्तरीत कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचा निरिक्षकांकडून आढावा

Omkar B