बेळगाव : वाडा कंपाऊंड, अनगोळ येथील महिलावर्गाच्या पुढाकारातून गल्लीत सामुहिक स्वरुपात तिळगूळ समारंभ पार पडला. यानिमित्ताने गल्लीतील महिलांनी एकत्रित यावे व परस्परांशी संवाद साधावा म्हणून गल्ली मर्यादित हा सोहळा पार पडला. यावेळी महिला मंडळ तसेच ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या. तिळगूळ समारंभात सहभागी महिलांना तिळगूळ व वाण देण्यात आले.


previous post