Tarun Bharat

कोल्हापूर : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पतीसह दोघांवर गुन्हा

वारणानगर / प्रतिनिधी

कोल्हापूर येथे बंगला घेणेसाठी पाच लाख रुपये हुंडा म्हणून माहेरहून आणावेत, मुलगी का जन्माला आली यासह तिहेरी तोंडी तलाख देवून जीवे मारण्याची धमकी व सतत शारिरीक व मानसिक छळ करीत असल्याच्या कारणास्तव वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील विवाहितेने पती, सासु, दीर या तिघाविरोधात कोडोली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.महिला फिर्यादी रूक्साना महमंद खतिब ही वाडी रत्नागिरी येथे माहेरी रहात आहे सन २०१३ ला लग्न झालेपासून एक मुलगी देखील झाली आहे. फिर्यादीस पती महमंद हा दोन महिन्यापूर्वी माहेरी सोडून कोल्हापूरच्या घरी गेला आहे.पती महमंद सज्जाउद्दीन खतीब दीर ईस्माइल, सासू हवाबी हे कोल्हापूर येथे बाबूजमाल दर्गा जवळ रहातात यातील पती याने बंगला घेण्यास पाच लाख रुपये आणावेत तसेच मुस्लीम धर्मात तोंडी तलाख द्वारे घटस्पोट देण्यास बंदी असून देखील वारवांर तोडी तलाख, शिवीगाळ, मारहाण केली जाते मुलगीच का झाली म्हणून देखील त्रास दिला जातो या कारणास्तव फिर्याद नोंदवली आहे पोलीस नाईक राजीव सानप तपास करीत आहेत.

Related Stories

सांगली : सोहोलीतील डॉ.स्मिता मोहिते बनली मिसेस इंडिया युके २०२०

Archana Banage

हरळी येथे वाहन धडकेत आरोग्य मित्राचा जागीच मृत्यू

Archana Banage

हस्तकला कारागीर कल्याण महामंडळ स्थापन करावे

Archana Banage

गुढीपाडव्यांनतर सोने-चांदी दरात वाढ

Archana Banage

”आरक्षण मुद्यावरुन केंद्र सरकारला पळ काढता येणार नाही”

Archana Banage

कोल्हापूर : कोदवडे येथे भर पावसात पेयजलचे काम, रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास

Archana Banage
error: Content is protected !!