Tarun Bharat

वाढदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून घातला वेगळा आदर्श

डॉ. गिरीश सोनवलकर यांच्या कार्याचे कौतुक

प्रतिनिधी /बेळगाव

प्रत्येकजण आपला वाढदिवस जल्लोष करून अथवा पार्टी करून साजरा करीत असतो. परंतु लेकव्हय़ू ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे संचालक डॉ. गिरीश सोनवलकर यांनी अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन करून डॉ. सोनवलकर यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. महांतेशनगर येथील सरकारी शाळेत हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी डॉ. सोनवलकर व लेकव्हय़ू हॉस्पिटलने कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल कौतुक केले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, डॉ. शशिकांत कुलगोड, डॉ. श्वेता सोनवलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते..

Related Stories

बैलूर येथे सीआरपीएफ अधिकारी शाईन कुमार यांचा सत्कार

Amit Kulkarni

ईस्कॉनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा

Amit Kulkarni

बेटणे-कणकुंबी-चोर्ला रस्ता दुरुस्तीला प्रारंभ

Omkar B

आजपासून वीरराणी कित्तूर चन्नम्मा उत्सवाला प्रारंभ

Patil_p

गांधी चौकातील रस्ता कधी खुला होणार?

Amit Kulkarni

वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी भुयारी मार्ग करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!