Tarun Bharat

वाढदिवसाच्या केकने पोहोचविले कारागृहात

Advertisements

वाढदिवस साजरा करताना बहुतेक जण केक कापतात. सामान्यतः केक कापण्यासाठी प्लास्टिक किंवा धातूपासून बनलेली सुरी किंवा चाकू वापरला जातो. तथापि दिल्लीतील एका व्यक्तीला अशा सामान्य पद्धतीने केक कापणे पसंद नव्हते. त्यामुळे त्याने केक कापण्यासाठी बटण चाकू वापरण्याचा विचार केला. मात्र त्याची ही योजना कोणीतरी पोलिसांना सांगितली. आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्याला अटक केली. व बटण चाकू जप्त केला.

परिणामी या व्यक्तीवर वाढदिवस कारागृहात साजरा करण्याची वेळ आली आहे. याचे कारण असे की बटण चाकूच्या उपयोगावर कायद्याने बंदी आहे. बटण चाकूचा उपयोग हत्या करण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्याच्यावर सर्वसामान्य उपयोगासाठी बंदी घालण्यात आली आहे. बटण चाकूने केक कापून वाढदिवस साजरा करणारी ही व्यक्ती वयाने 18 पेक्षा कमी असल्याने, म्हणजेच अज्ञान असल्याने तिचे नाव घोषित करण्यात आले नाही. तथापि या घटनेवरून सर्वांनी घ्यायचा धडा असा की वाढदिवसाचा केक कापतानाही कायद्याचा विचार करणे आवश्यक आहे. केक कापण्यासाठी तलवार किंवा बटण चाकूसारख्या बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंचा उपयोग केल्यास भलताच प्रसंग आपल्यावर ओढवतो.

Related Stories

यावर्षी होणार ५ कंपन्यांचे खासगीकरण

Amit Kulkarni

पेट्रोलनंतर आता डिझेलही ‘शंभरी’कडे

Patil_p

“गाईचं शेण, गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि …” : मुख्यमंत्री शिवराज सिंहांचे वक्तव्य

Abhijeet Shinde

नवी मुंबईतील CRPF च्या सहा जवानांना कोरोनाची बाधा

prashant_c

नोएडातले ‘ते’ ४० मजली टॉवर्स पाडा – सर्वोच्च न्यायालय

Abhijeet Shinde

देशात चोवीस तासात 25,320 नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!