वार्ताहर / गोकुळ शिरगाव
विद्युत मंडळाच्या चुकीमुळे अवास्तव आलेली वाडीव वीजबिले रद्द करून दर महिन्याच्या सरासरी प्रमाणे वीज बिलाची आकारणी करावी अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने सहाय्यक उप अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ गोकुळ शिरगाव यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनामध्ये ,कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील सर्व नागरिक शेतकरी वर्ग आर्थीक अडचणीत आला असून त्यातचं महावीतरण कडून एकदम 3 महीन्याचे बिल आकारणी करून वाढीव विज बिले दिले आहेत.हे विज बिल पाहता ग्राहकांना चांगलाच मनस्ताप झाला आहे. तरी संपूर्ण लॉकडाऊन काळातील विज बिले माफ करावीत दर महिन्याच्या रिडींग प्रमाने विज बिल आकारणी करावी विज बिल न भरलेल्या ग्राहकांच्या लाईट कनेक्शन बंद करू नये मागणी करूनही अध्याप ज्यांना विज कनेक्शन मिळाले नाही ती देण्यात यावीत.
संबंधित आधीकार्यांनी प्रत्येक गावात जाऊन शंकेचे निरसन करावे तरी वरील मागन्या मान्य व्हाव्यात या मागणीचे निवेदन शिवसेना करवीर तालूका प्रमुख विनोद खोत यांच्या नेतृत्वाखाली महावीतरण सहा.उप अभियंता आर. एस. कांबळे व एस. एस. शिंदे यांना देण्यात आले. यावेळी भगवान कदम , दयानंद शिंदे,शांताराम पाटील,सुरेश पाटील,अभिजीत पाटील,बबलू शेख,सुरेश वारके,रवी जाधव,योगेश पाटील,दिपक वारके,उमेश यादव व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.


previous post