Tarun Bharat

वाढेफाटय़ावर पालिकेच्या दुर्लक्षा गटारगंगा सेवारस्त्यावर

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेच्या हद्दीत नव्याने आलेल्या वाढे फाटा येथील परिसरात गेल्या चार महिन्यापासून पालिकेच्या नगरसेवकांना सांगूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. गटर तुंबल्याने सेवा रस्त्यामधून गटरचे पाणी वाहत असून त्यामुळे नजिकच्या व्यवसायिकांना या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याकडे नगरसेवक व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून याची दुरुस्ती जर केली नाही तर पालिकेच्या नगरसेवकांना त्याच गटारचे पाणी भेट देणार असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले.

पूर्वी खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या वाढे फाटय़ाचा पुलाच्या अलिकडील परिसर हा हद्दवाढीनंतर सातारा शहरात आलेला आहे. सुरुवातीच्या काळात सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने या भागात लक्ष घातले. परंतु गेल्या सहा महिन्यापासून याकडे दुर्लक्ष होत आहे. गटराच्या पाण्याची पाईपलाईन ही सेवा रस्त्याच्या खालून गेली असून ती सेवा रस्त्याच्या कडेला तुंबल्याने सेवा रस्त्यालाच उफळा फुटून घाण पाणी वास मारत वाहत आहे. त्यामुळे आजुबाजूच्या व्यवसायिकांना याचा त्रास होत आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथील नागरिकांनी वारंवार सातारा पालिकेकडे याबाबत कैफियत मांडली परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे येथील व्यावसायिकांमधून आरोग्य विभागाबाबत तीव्र नाराजीचा सुर आहे.

आम्ही नगरसेवकांना गटाराचे पाणी भेट देणार

आम्ही कित्येक दिवस हा त्रास सहन करतो आहे. सातारा पालिकेकडून काम होत नाही. आता हे काम जर झाले नाही तर नगरसेवकांना हेच घाण पाणी भेट देणार आहे.

अतुल कदम वाढे फाटा व्यावसायिक

लवकरात लवकर सातारा पालिकेने समस्या दुर करावी

पालिकेकडून नुसता दिखावा नको आहे. काम केले पाहिजे. हायवेच्या सेवा रस्त्यावर पालिकेच्या गटराचे पाणी वाहते आहे. त्याचा आम्हा व्यावसायिकांना त्रास होत आहे. ही समस्या पालिकेने दुर करावी.

Related Stories

शहरात वाढतोय डेंग्यु

Patil_p

कोविड स्थिती नियंत्रणात आल्याने निर्बंध शिथिल

datta jadhav

युवकाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांवर गुन्हा

datta jadhav

शिक्षक समितीच्या मेळाव्यात मजबूत संघटना बांधनीचा निर्धार

Patil_p

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाला उद्यापासून साताऱ्यात सुरुवात

datta jadhav

सातारा जिल्ह्यात 1086 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 35 नागरिकांचा मृत्यू

Archana Banage