Tarun Bharat

वादग्रस्त सीडी प्रकरणाचा तपास अहवाल सादर करा

उच्च न्यायालयाची एसआयटीला सूचना

बेंगळूर : वादग्रस्त सीडी प्रकरणाशी संबंधित तपास अहवाल सादर करण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि एसआयटीला दिली आहे. सीडी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी करून वकील उमेश यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. सोमवारी विभागीय पीठाने या याचिकेवर सुनावणी करताना बंद लखोटय़ात सीडी प्रकरणाच्या तपासाचा प्रगती अहवाल सादर करावा, अशी सूचना राज्य सरकार आणि एसआयटीला दिली. प्रसारमाध्यमांपर्यंत एसआयटीची माहिती पोहोचत असल्यासंबंधी आणखी एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने यामध्ये विनाकारण अंतरिम आदेश देणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच या प्रकरणाची सुनावणी 17 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली.

Related Stories

कर्नाटकात बुधवारी कोरोनाचे ८,५८० रुग्ण

Archana Banage

प्रलंबित म्हादाई योजना आता लवकरच कार्यान्वित – पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ

mithun mane

बेंगळूर पोलीस प्रमुखांनी १५ ऑगस्ट पर्यंत कर्फ्यू वाढविला

Archana Banage

गोहत्या बंदी विधेयक विधानपरिषदेतही संमत

Patil_p

कर्नाटक : आरक्षणाच्या मागण्यांवर निवृत्त न्यायाधीशांची समिती गठित करण्याचा निर्णय

Archana Banage

गरीब-श्रमिकांना विशेष पॅकेजचा आधार

Amit Kulkarni