Tarun Bharat

वादळामुळे ऑर्किड लागवडीचे 8 लाखांचे नुकसान

Advertisements

प्रतिनिधी / काणकोण

फार मोठी आशा आणि अपेक्षा धरून ऑर्किडसारख्या नव्या क्षेत्रात उतरलेल्या पणसुले-काणकोण येथील विशाल उल्हास देसाई या युवकाला मागच्या वर्षी कोरोना महामारीने दगा दिला, तर यंदा तौक्ते वादळाने दगा दिल्यामुळे त्याला 8 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसानाचा सामना करावा लागला आहे.

ऑर्किडसारख्या क्षेत्रात उतरण्यासाठी धाडस असावे लागते. या व्यवसायात उतरलेल्या देसाई यांनी आपला व्यवस्थित जम बसविला असतानाच मागच्या वर्षी कोविड महामारीने संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. मागच्या वर्षी काही लाखांचे नुकसान, बँकेच्या कर्जाचा फटका, कामगारांचे वेतन यातच वर्ष गेले. माजी कृषीमंत्री रमेश तवडकर यांचे प्रोत्साहन आणि पुढाकार यामुळे आपण या क्षेत्रात उतरलो आणि योग्य नियोजनाच्या बळावर आतापर्यंत जम बसवून होतो. या क्षेत्रात उतरणाऱयांना खूप मेहनत करावी लागती. संयमाने काम करावे लागते, असे मत देसाई यांनी व्यक्त केले. यंदा आपल्या फार्मवर चांगले पीक आले होते. मागच्या वर्षीचे नुकसान यंदा भरून काढण्याच्या उमेदीत असतानाच अकस्मात आलेल्या वादळाने संपूर्ण पिकाची नासाडी केली. आपल्या फार्मच्या शेडची हानी केली. होते नव्हते ते सर्व वाऱयाने आपल्याबरोबर नेले, असे देसाई यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मागच्या वर्षीचे नुकसान यंदा निश्चितच भरून काढता आले असत. मात्र नियतीपुढे कोणाचे काहीच चालेना, अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Related Stories

प्रदेश भाजपकडून पंतप्रधानांचे अभिनंदन

Patil_p

शिरोडय़ात 1.30 लाखांचा गांजा जप्त; संशयिताला अटक

Amit Kulkarni

उच्च शिक्षण संचालनालयाचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर

Patil_p

पर्वरीत कडकडीत बंद

tarunbharat

उत्तरप्रदेश सरकारने मुलांवर होणारी छळणूक थांबवावी गोवा महिला काँग्रेसची मागणी

GAURESH SATTARKAR

वास्कोतील टुरिष्ट हॉस्टेलमध्ये राजस्थानी ग्रामीण मेळा

Amit Kulkarni
error: Content is protected !!