Tarun Bharat

वादळी वाऱयामुळे वर्धन ऍग्रोचे गोडावून भुईसपाट

25 लाखाचे नुकसान, महसूल अधिकाऱयांची घटनास्थळी भेट

वार्ताहर / औंध

  काल झालेल्या वादळी वायासह धुव्वाधार पावसामुळे घाटमाथ्यावरील वर्धन अँग्रो कारखान्याचे जाँगरी पावडर साठवण करण्यासाठी उभारलेले गोडावून भुईसपाट होऊन अंदाजे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की औंधसह परीसरात सलग तीन दिवस उन्हाळी पावसाने झोडपून काढले आहे. काल दुपारीवादळी वायासह जोरदार पावसाने घाटमाथा येथील वर्धन अँग्रो साखर कारखान्यावर साखर आणि जाँगरी पावडर साठवणूक करण्यासाठी बांबू आणि टारपोलीन कागदापासून अंदाजे 60 बाय 250 फुट लांबीचे दक्षिण उत्तर गोडावून तयार करण्यात आले आहे. सोसाटय़ाचा वारा आणि धुव्वाधार पावसाने गोडावून अक्षरशः भुईसपाट झाले. टारपोलीनचा छत फाटून आतील जाँगरी पावडर आणि इतर साहित्याचे अंदाजे 25 लाखाचे नुकसान झाले आहे. आज घटनास्थळी महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Related Stories

सातारा : यवतेश्वर घाटात अपघात, युवक ठार

Archana Banage

विठ्ठल मंदिरात सजावट केलेले एक टन द्राक्षे गायब, भाविकांची चौकशीची मागणी

Archana Banage

कराड आगारात ‘वरून कीर्तन… आतून तमाशा’

Patil_p

पीएफएमएस प्रणालीद्वारे विकास निधी वितरण होणार

Patil_p

कृष्णा घाटावर यशवंत महोत्सवास प्रारंभ

Patil_p

जिल्हय़ात 59 हजार लसीचे डोस उपलब्ध

Amit Kulkarni