Tarun Bharat

वादळ नाही, तर त्याच्याशी झुंज महत्वाची!

  कोरोनाच्या संकटात ‘व. पु.’ ची वाक्ये होतायेत अधोरेखित संकट बनलंय वैश्विक : साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर

चंद्रकांत सामंत / कुडाळ:

‘जेव्हा वादळे येतात, तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रोवून राहायचं असतं. ती जितक्मया वेगाने येतात तितक्मयाच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं. प्रश्न असतो की, आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱया अवस्थेत बाहेर येतो हे महत्वाचं…इति व. पु. काळे.

व. पु. ची ही वाक्मयं आठवायचं कारण म्हणजे आजचं कोरोना हेही एक वादळच आहे. ते वेगाने आलेले आहे. त्याच वेगाने ते निघूनही जाईल. मात्र, आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱया अवस्थेत बाहेर येतो हे महत्वाचं आहे.

कोरोनाचे संकट वैश्विक आहे. या वादळाचा वेग काही भागात मंदावलेला आहे, तर काही भागात थांबलेला आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माणसा-माणसात सुरक्षित अंतर ठेवा, असे सांगितले जात आहे.

           संचारबंदीमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर परिणाम

देशात लॉकडाऊनची मुदत तीन मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. असे असले, तरी ज्या भागात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही, त्या भागात काही नियम शिथील करण्यात आले आहेत. काही विभाग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठीही नियम व अटी आहेत. अत्यावश्यक वस्तूंबरोबर अन्य वस्तू मिळणारी दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी शासनाने दिली असली, तरी संचारबंदीमुळे बाजारपेठेत सर्वसामान्य ग्राहक येत नाहीत.

                 शासन स्तरावर चांगलं काम

राज्यात पहिले लॉकडाऊन जाहीर झाले आणि सर्वसामान्यांची धावपळ सुरू झाली. मिळेल तसे, मिळेल तेथून सामानाची जमवाजमव केली. त्यांचे काही दिवस घरी राहूनच गेले. नेलेल्या वस्तू संपत आल्या. लॉकडाऊनच्या नियमांची कडक अमंलबजावणी सुरू झाली. पोलिसांनी आपला धाक दाखवायला सुरूवात केली. अत्यावश्यक सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचाव्यात, कोणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी स्वयंसेवक, संस्था आदींना पासेस दिले. शासन आपल्या स्तरावर चांगलं काम करीत आहे.

            पास आणि ओळखपत्र बनली ‘ओळख’

लॉकडाऊनच्या कालावधीत पैसा आणि माणूस या ओळखीपेक्षा पास आणि ओळखपत्र हीच ओळख खरी ठरत आहे. अशा पासधारकांसह ओळखपत्र असलेल्या सर्वांना जीवनावश्यक वस्तू कमी पडल्या नाहीत. त्यांच्या पाहुण्यांना तसेच त्यांच्या मित्रांना काही कमी पडले नाही. मित्रांकडे, पाहुण्यांकडे अशा सर्वांचे जाणे-येणे सुरू आहे.

              गुन्हे दाखल झालेले सर्वसामान्य?

ज्यांच्याकडे ‘सरकारी ओळख’ नाही, असा सर्वसामान्य माणूस मात्र या कालावधीत घराबाहेर पडला नाही. ज्यांना काही कारणास्तव घराबाहेर पडावे लागले त्यांना पोलिसांनी अडवले. काहींची कारणे त्यांना पटली. काहींची कारणे पटली नाहीत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. ते सर्वसामान्य असल्याची चर्चा आहे.

                 सर्वांनी निर्बंध पाळणे आवश्यक

समाजाची खऱया अर्थाने प्रामाणिक सेवा करणाऱया समाजसेवकांनी सेवा दिली. काही समाजसेवकांनी गरीब व भुकेलेल्यांना आपल्या माध्यमातून शोधून त्यांना मदत केली आहे, तर काहींनी प्रसिद्धी व फोटोसाठी मदत केल्याचेही बोलले जात आहे. संचारबंदी असतानाही दारू कुठेही मिळत असल्याची चर्चा आहे. सहा आठवडे निघून गेले आहेत. येथील माणूस स्वयंशिस्त पाळणारा व कायदा मानणारा असल्याने उर्वरित दिवसही चांगलेच जातील. कोरोनारुपी वादळ काही काळाने शांत होईल. मात्र, त्यासाठी सर्वांनी असलेले निर्बंध पाळले पाहिजेत.

Related Stories

गोव्यात नियमित जाणाऱयांना ओळखपत्रे द्या

NIKHIL_N

युवतीसेना कांदळगाव शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

Anuja Kudatarkar

गणपतीपुळे मंदिरातील बाप्पांचे दर्शन आता स्क्रीनवर!

Patil_p

सावंतवाडीत एकाच कुटुंबात सातजण पॉझिटिव्ह

NIKHIL_N

मालवणात कावनाला आग लागून दहा लाखाचे नुकसान

NIKHIL_N

तळीरामांना मिळणार घरबसल्या दारु

Archana Banage