Tarun Bharat

वानखेडेंची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने केलेले आरोप ग्राह्य धरु नये, यासाठी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
हे प्रकरण उच्च न्यायालयात असल्यामुळे सुनावणीला सत्र न्यायालयाने नकार दिला असून, वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुख्य साक्षीदार बनलेल्या किरण गोसावीने शाहरूख खानकडे 25 कोटींची मागणी केली होती. ही डील 18 कोटींना सेटल होणार होती. यामधील 8 कोटी एनसीबी अधिकाऱयांना देण्यात येणार असल्याचा धक्कादायक खुलासा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने रविवारी केला होता.. त्यानंतर राजकीय नेत्यांसह अनेकांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वानखेडेंच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर वानखेडे यांनी पंच प्रभाकर साईल याने केलेले आरोप ग्राह्य धरु नये, यासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली.

Related Stories

मेघडंबरीजवळील जोत्याचे काम पारंपरिक पद्धतीने

Abhijeet Khandekar

जिह्यात पुन्हा बाधित वाढीचा वेग वाढला

Patil_p

‘स्वाभिमानी’चे 4 मार्चला महाराष्ट्रभर चक्काजाम

Abhijeet Khandekar

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर NCB च्या ताब्यात

Tousif Mujawar

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

अमेरिकेत 900 बिलियन डॉलर्सचे कोरोना पॅकेज

datta jadhav
error: Content is protected !!