Tarun Bharat
Image default

वाफ घेतल्यामुळे… ब्युटी टॉक

चेहर्याचा तजेला टिकवून ठेवण्यासाठी आपण बरंच काही करतो. वेगवेगळी क्रीम्स चोपडतो. स्क्रबिंग, टोनिंगसारखे सोपस्कार करतो. मात्र यासोबतच चेहर्याला वाफही द्यायला हवी. वाफ दिल्यामुळे चेहर्यावरची रोमछिद्र खुली होतात आणि चेहर्याच्या विविध समस्या दूर व्हायला मदत होते.

  • चेहर्यावरची धूळ, घाण स्वच्छ करण्यासाठी वाफ घेणं गरजेचं आहे. वाफ घेतल्यानंतर मृत त्वचा पटकन काढता येते. रोमछिद्रं स्वच्छ होतात आणि तुमच्या त्वचेला श्वास घ्यायला वेळ मिळतो.
  • ब्लॅक हेड्सची समस्या दूर करण्यासाठी आठवडय़ातून दोन वेळा चेहर्याला वाफ द्या. ब्लॅक हेड्स काढून टाकण्यासाठी साधारण पाच ते दहा मिनिटं चेहर्याला वाफ द्या. यानंतर हलक्या हाताने स्क्रबिंग करा. स्क्रबिंगमुळे चेहर्याची त्वचा मऊ होते आणि व्हाईट तसंच ब्लॅक हेड्स पटकन काढता येतात.
  • वाफ घेतल्यामुळे चेहर्यावरच्या सुरकुत्यांचा प्रश्न निकालात निघतो. वाफेमुळे चेहर्याचा ओलावा टिकून राहतो. यामुळे त्वचा कोरडी होत नाही.
  • त्वचेतल्या तैलग्रंथींमध्ये धूळ, घाण साचल्यामुळे पिंपल्सची समस्या निर्माण होते. पण वाफ घेतल्यामुळे रोमछिद्रं स्वच्छ होतात आणि पिंपल्सना आळा बसतो.
  • तुम्ही घरीच स्टीमरने वाफ घेऊ शकता. स्टीमर नसेल तर एका पातेल्यात पाणी गरम करा. आता चेहरा पातेल्याच्या थोडा वर ठेऊन वाफ घ्या. टॉवेलने चेहरा झाकून घ्या यामुळे वाफ थेट चेहर्यावरच येईल.

Related Stories

जपावे दंत आरोग्य

Omkar B

प्रदुषणानं घटतंय आयुर्मान

Omkar B

प्युमिक स्टोन वापरून तुमच्या त्वचेचं सौंदर्य खुलवा

Kalyani Amanagi

प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री

Omkar B

राष्ट्रीय आयुष संस्थांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Abhijeet Khandekar

बाल्कनीत, खिडकीत कबूतर घाण करताहेत? ,’या’ टिप्स फॉलो करा

Archana Banage
error: Content is protected !!