Tarun Bharat

वायदे बाजारात सोन्याचा नवा उच्चांक

ऑनलाईन टीम / मुंबई : 

कोरोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे सावट असताना गुंतवणूकदारांचा मात्र, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढता कल आहे. आज वायदे बाजारात सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठली. एमसीएक्स एक्स्चेंजवर आज ट्रेडिंगवेळी 5 जून 2020 च्या सोन्याच्या वायदा दराने 46670 रुपये प्रति 10 ग्रॅमची उंची गाठत नवीन रेकॉर्ड बनविले आहे. 
 

तर 5 ऑगस्ट 2020 च्या वायदा दराने आज 0.85 टक्के म्हणजेच 396 रुपयांची वाढ नोंदविली आहे. हा दर 46,850 रुपये प्रति 10 ग्रामवर टेंड करत आहे. आतापर्यंत हा सोन्याचा सर्वात उच्चांकी दर आहे. वायदे बाजारात आज चांदीच्या दरातही 664 रुपयांची वाढ होऊन चांदी 44, 420 प्रति किलोवर पोहचली.

Related Stories

एलआयसी आयपीओपूर्वी सेबीने बदलले नियम

Amit Kulkarni

पोर्शेची भारतीय बाजारात नोंदणीय कामगिरी

Patil_p

ऍपल एसइ 3 चे उत्पादन घटवणार

Patil_p

एप्रिलमध्ये विजेचा वापर वाढला

Patil_p

जूनपर्यंत नोंदणीकृत कंपन्यांची संख्या 20.14 लाखाच्या घरात

Patil_p

ऍमेझॉननंतर फ्लिपकार्टकडून ऑनलाइन औषधविक्री

Patil_p