Tarun Bharat

वारकरी चालती पंढरीची वाट…

Advertisements

आठ दिंडय़ा पंढरीच्या वाटेवर : वारकऱयांना विठुरायाची ओढ

प्रतिनिधी /बेळगाव

हातात पताका, डोक्मयावर कळशी, टाळ-मृदंगाचा गजर आणि भजनात तल्लीन होवून ग्रामीण भागातून दिंडय़ा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. बेळगाव परिसरातून आठ दिंडय़ांचे या आठवडाभरात प्रस्थान झाले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर यंदा प्रत्यक्ष पायी दिंडय़ा निघाल्याने वारकरी उत्साही झाले आहेत. विठुरायाच्या दर्शनाची आस त्यांना लागली आहे.

बेळगाव परिसरातून सांबरा, निलजी, आंबेवाडी, धामणे, कंग्राळी खुर्द, देवगणहट्टी (धामणे), कसबा नंदगड (खानापूर) आदी भागातून दिंडय़ा मार्गस्थ झाल्या आहेत. प्रत्येक दिंडीत 200 ते 250 वारकरी केवळ विठुरायाच्या भक्तीपोटी दाखल झाले आहेत. 20 आणि 21 जून रोजी देहू व आळंदी येथून मानाच्या पालख्यांचे प्रस्थान झाले. त्यापाठोपाठ बेळगाव परिसरातील दिंडय़ा पंढरपूरच्या वाटेवर रवाना झाल्या. तब्बल दोन वर्षांनंतर दिंडीत सहभागी होता आल्याने वारकऱयांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. 25 जूनपासून एकेक करत ग्रामीण भागातून दिंडय़ांनी पंढरीची वाट धरली आहे.

मागील दोन वर्षात आषाढी सोहळा केवळ प्रतिकात्मक रुपात झाला होता. दरम्यान, वारकऱयांना दिंडीपासून आणि विठुरायाच्या दर्शनापासून दूर राहावे लागले होते. यंदा प्रत्यक्ष दिंडी आणि विठुरायांचे दर्शन होणार असल्याने वारकऱयांना पंढरीची ओढ लागली आहे. कोरोनामुळे दोन वर्षात दिंडय़ांना ब्रेक लागला होता. मात्र, यंदा दिंडी प्रत्यक्ष पंढरीची वाट चालू लागली आहे. त्यामुळे दिंडय़ांना  वारकऱयांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दरवषी बेळगाव परिसरातून पंढरपूरला 8 ते 10 दिंडय़ा मार्गस्थ होतात. यंदा 8 दिंडय़ा पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाल्या आहेत. कोरोनाच्या दोन वर्षानंतर दिंडय़ा पूर्ववतपणे सुरू झाल्याने वारकऱयांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.

भगवंताच्या कृपेने यंदा दिंडी पूर्ववतपणे सुरू

दोन वर्षांनंतर यंदा दिंडीत सहभागी होता आले. मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेली दिंडी कोरोनामुळे थांबली होती. मात्र, भगवंताच्या कृपेने यंदा दिंडी पूर्ववतपणे सुरू झाली आहे. त्यामुळे वारकऱयांमध्ये आनंदी वातावरण आहे. पंढरपूर मार्गावर पायी दिंडी चालत आहे. आषाढी एकादशीच्या आधी एक दिवस दिंडी पंढरपुरात पोहोचणार आहे. 

– गोविंद महाराज (निलजी)     

Related Stories

मंगळवारी जिह्यात 18 जण पॉझिटिव्ह

Patil_p

सिंदगीमधील दोन मंदिरांमध्ये चोरी

Patil_p

स्मार्ट सिटीच्या कामांबाबत तीव्र संताप

Amit Kulkarni

ऑर्चर्ड रिसॉर्ट नावगे क्रॉस येथे ‘रंग बरसे’ होलिकोत्सव

Amit Kulkarni

आंतरराष्ट्रीय पॅराटेबलटेनिसपटूंची बेळगावला भेट

Patil_p

श्री सरस्वती को-ऑप. सोसायटीची सभा खेळीमेळीत

Omkar B
error: Content is protected !!