Tarun Bharat

वारकरी भजनी मंडळ संत रोहिदास पुण्यतिथी साजरी

प्रतिनिधी/ बेळगाव

खासबाग, पाटील गल्ली वारकरी भजनी मंडळ यांच्याकडून आचार्य गल्ली श्रीराम मंदिरामध्ये दि. 10 रोजी सायंकाळी संत रोहिदास  पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संत रोहिदास यांच्या चरित्राविषयी त्यांचे आचार विचार लोकांपर्यंत पोहचले पाहिजे, जगाच्या कल्याणासाठी संताच्या विभूती हे प्रवचन सांगण्यामध्ये खरी पुण्यतिथी साजरी होणार आहे, असे विचार हभप लव महाराज नार्वेकर यांनी सांगितले. रात्री 9 वाजता भजन झाल्यानंतर संत रोहिदास यांच्या फोटोवर पुष्पवृष्टी करण्यात आली. आरती व प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी भजनी मंडळाचे अध्यक्ष हभप लक्ष्मण बन्नार, कुश महाराज नार्वेकर, बाळू पाटील, चंदू बेळगावकर, राजाराम सुतार, चन्नावा नार्वेकर, फोंडू सुतार, मोहन वादवणे, बाळकृष्ण नार्वेकर, कृष्णा व विनोद नार्वेकर, ज्ञानेश्वर महाराज काकडे, हभप वैजनाथ उचुकर, शंकर नार्वेकर, विलास कुंदे उपस्थित होते.

Related Stories

कुंदरगी पंपहाऊसजवळ जलवाहिनीला भगदाड

Amit Kulkarni

पुन्हा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाला जिल्हाधिकाऱयांची सक्त ताकीद

Patil_p

रानडुकराच्या हल्ल्यात गवाळीतील महिला जखमी

Omkar B

हिजाब घालण्यासंदर्भातील निर्बंधाचा विचार करावा

Amit Kulkarni

इटगी येथे घराची भिंत कोसळून आजी, नातवाचा मृत्यू

Amit Kulkarni

चाचणी केल्यानंतर व्यक्तीमध्ये आढळून आली कोरोनाची लक्षणे

Tousif Mujawar