Tarun Bharat

वारणा दुध संघाच्या कर्मचाऱ्यांची गुजरातच्या आनंद दूध प्रकल्पास भेट

Advertisements

वारणानगर / प्रतिनिधी

वारणानगर येथील वारणा सहकारी दुध -उत्पादक प्रक्रिया संघातील वारणा दुध कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुजरात येथील आनंद दुध प्रकल्पास (अमुल ) भेट देवून अभ्यास दौरा पूर्ण केला.

यावेळी गुजरात येथील दुग्ध प्रकल्पातील अद्यावत यंत्र सामुग्री, दुग्धव्यवसाय उत्पादन वाढ,कॅडबरी प्रकल्प, लॅब आदि विभागासह तेथील दुग्ध व्यवसायाची शिष्ठमंडळाने माहीती जाणून घेतली. जागतिक बाजारपेठेत दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात वारणा ब्रॅण्डचा मोठा नावलौकीक आहे. वारणा दुध संघाचे अध्यक्ष डॉ.विनय कोरे, उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर,सचिव के.एम.वाले, संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथे दोन दिवस कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये वारणाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. दुधसंकलन,दुध,दुग्ध पदार्थ-उत्पादन वाढ व विक्री, प्रकल्पामधील प्रोसेसिंग व अन्य अद्यावत अशी प्रकल्पांमधील माहीती घेतली. प्रामुख्याने अमुल दुध संघात कॅडबरी प्रकल्पात अद्यावत अशा रोबोद्वारे चॉकलेट तयार केले जाते. त्याची विशेष माहीती कर्मचाऱ्यांनी घेतली.तसेच अद्यावत लॅबची पाहणी देखील करण्यात आली. अमुल दुध संघातील लिनोपीयोनो, एनडीडीबीच्या लॅब इनचार्ज पाटील (खोचीकर) यांनी सविस्तर माहीती दिली. यावेळी दुग्ध व्यवसायातील धवल क्रांतीचे जनक वर्गीयस कुरियन यांच्या कार्याची व आनंद दुग्ध प्रकल्पाच्या जडणघडणीवर माहीतीपट दाखविण्यात आला.

यावेळी वारणा दुध संघ कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, उपाध्यक्ष प्रकाश निकम, उदयसिंह जाधव, लालासाहेब देसाई, भिमराव पाटील, सुरेश निकम, सुखदेव जाधव, शिवाजी काळोखे, शिवाजी गंगथडे, विलास पाटील, दगडू पाटील, दिलीप पाटील, सर्जेराव पाटील, रामचंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर जिल्हा परिषद स्थायी सभेत शिळ्या कढीला ऊत

Abhijeet Shinde

शुटींगसाठी कोल्हापूर बेस्ट स्पॉट!

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पांगिरेनजीक भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

Abhijeet Shinde

रेल्वेमध्ये बनावट नियुक्तीपत्र देऊन १० लाख ५० हजाराची फसवणूक, गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

मुरगूड ग्रामीण रुग्णालय 50 बेडचे होण्याची प्रतिक्षा संपेना

Abhijeet Shinde

कबनूरात सरपंच व उपसरपंच दालनात टाकली मृत डुकरे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!