Tarun Bharat

वारणेच्या बंधारे दुरूस्तीसाठी दहा कोटींचा निधी : जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील

प्रतिनिधी / वारणानगर

वारणा नदीवरील बच्चेसावार्डे, कोडोली, तांदुळवाडी येथे असणाऱ्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याची झालेल्या पडझडीची पहाणी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यानी केली .

शिराळा मतदार संघाचे आमदार मानसिंगराव नाईक यानी वारणा नदीवरील मांगले ता. शिराळा व तांदुळवाडी ता. वाळवा इथे पर्यन्तच्या स्वत्ताच्या मतदार संघातील वारणा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याची पीलर पडून तसेच महापूराने बंधाऱ्यांच्या बाजूने खायलेला भाग यामुळे झालेली दुरावस्था व पडझडीने पुरेसा पाणी साठा होत नसलेने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या संदर्भाने ना. जयंत पाटील यांना घेवून प्रत्यक्ष बंधाऱ्याची पहाणी दौरा केला .

बच्चे सावर्डे (ता.पन्हाळा)ते मांगले(ता.शिराळा) या बंधाऱ्यासाठी सुमारे साडेचार कोटी रू.,कोडोली ता.पन्हाळा, ते चिकुर्डे ता. वाळवा, या बंधाऱ्यांच्या बाजूने खचलेला भराव पुन्हा खचू नये यासाठी जादा नळ बसवणे चावरे ता. हातकंणगले ते ऐतवडे खुर्द ता. वाळवा या बंधाऱ्यासाठी सुमारे साडेचार कोटी रू. असा अंदाजे दहा कोटी रू. दुरुस्तीचा खर्च असून या संदर्भाने पाटबंधारे विभागाने पाठवलेल्या आराखडा व अंदाज पत्रकास तातडीने मंजूरी देणार असल्याचे ना. जयंत पाटील यानी सांगून घुणकी ता.हातकंणगले ते तांदुळवाडी ता. वाळवा या गावा दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने आराखडा व अंदाजपत्रक पाठवण्याचे आदेश त्यानी पहाणी दौऱ्यात अधिकाऱ्याना दिले .

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, हातकंणगले व सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा मा चार तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदायी असलेल्या मांगले येथील वारणा व मोरणा या दोन नद्यांच्या संगमावरील मांगले- सावर्डे,चावरे – ऐतवडे खुर्द या कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा विशेष दुरुस्तीचे काम लवकरच मार्गी लागून हे बंधारे चांगल्या प्रकारे विशेष बाब म्हणून भक्कम व्हावेत अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती. येथे साठणाऱ्या पाण्याचा वापर हजारो एकर क्षेत्राला होत आहे त्यामुळे हे काम लवकर मार्गी लावणार असल्याचे जलसंपदा  मंत्री जयंतराव पाटील यांनी सांगितले .

आमदार मानसिंगराव नाईक यांनी जलसंपदा मंत्री ना. पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यावरून मुख्य अभियंता कोल्हापूर यांनी बंधारा विशेष दुरुस्तीची मागणी प्रस्तावाद्वारे केली होती. सर्व दुरुस्तीच्या अंदाजे १० कोटी रू.च्या सुधारीत प्रस्तावाला अद्यापही प्रशासकीय मंजुरी मिळालेली नव्हती. मात्र आज मंत्री ना. जयंत पाटील यांनी या बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सदर काम लवकरात लवकर हाती घेऊन ते पूर्ण करणार असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासन दिले .

यावेळी युवा नेते विराज नाईक,मुख्य अभियंता आर. डी. मोहिते, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मांगलेचे माजी सरपंच राजेंद्र दशवंत, शिराळा युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल पवार, विश्वासचे संचालक सुरेश पाटील व दत्तात्रय पाटील, वारणा बॅकेचे संचालक विनायक बांदल, एन्.डी.बच्चे, सावर्डे ग्रा.पं सदस्य दादा पाटील,पोलीस पाटील सागर यादव, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, वारणा पाटबंधारे विभागाचे मुख्य विभागीय अधिकारी मिलिंद किटवाडकर या दौऱ्यात सहभागी होते .

Related Stories

महाराष्ट्रातील कोरोना : सद्य स्थितीत 1,61,864 रुग्णांवर उपचार सुरू

Tousif Mujawar

१०० टक्के लसीकरण करा अन्यथा निर्बंध झुगारु; बालिंगा ग्रामस्थांचा इशारा

Archana Banage

माफीची साक्षीदार ज्योती मांढरेला जामिन

Patil_p

सातारा पालिकेत प्रभारी पाणी पुरवठा अभियंता कोरोना बाधित

Patil_p

कोरोना : महाराष्ट्रात 3,081 नवे रुग्ण; 50 मृत्यू

Tousif Mujawar

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 12 ऑगस्टला

Archana Banage