Tarun Bharat

वारणेत तिहेरी अपघात; एक ठार, तिघे गंभीर जखमी

Advertisements

वारणानगर / प्रतिनिधी

बोरपाडळे वाठार ह्या राज्य मार्गावरील वारणे जवळ असलेल्या अमृतनगर फाट्याजवळ ता.पन्हाळा येथे दुरुस्ती साठी रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या आयशर टेम्पोला भरधाव वेगाने आलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हर शेजारी बसलेला गोरख शेनाभाऊ सोनुले (वय ३५ ) रा.धुळे हा तरुण जागीच ठार झाला तर ट्रॅक्टरला भरधाव कारची धडक बसल्याने कार मधील तिघे जण गंभीर जखमी झाले.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवार दि.२३ रोजी मध्यरात्री वाठार कडून वारणा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालला होता. अमृतनगर फाट्याजवळ आयशर टेम्पो नादुरुस्त अवस्थेत दुरुस्ती साठी रस्त्याच्या कडेला उभा होता. टेम्पोला पाठीमागून या ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली धडक इतकी जोरात होती की आयशर टेम्पो शेजारील दुकानांमध्ये घुसला तर ट्रॅक्टरची पुढील दोन चाकांची एक्सेल तुटून गेल्याने ट्रॅक्टर चालका शेजारी बसलेला गोरख सोनुले हा ट्रॅक्टरवरून खाली रस्त्यावर पडल्याने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची दोंन्ही चाके त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.

याचवेळी भरधाव वेगाने वठारकडे चाललेल्या कारची धडक ट्रॅक्टरला बसल्याने कार मधील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांची नावे समजू शकलेली नाहीत परंतु जखमी हे सांगली जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे.

Related Stories

कोल्हापुरात कडकडीत लॉकडाऊन; पहा ही दृश्ये

Abhijeet Shinde

सणासाठी दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळावी

Abhijeet Shinde

शाहू छत्रपतींनी एकाचा कपटपणा उघड केला: संजय राऊत

Abhijeet Shinde

जिल्हा परिषद स्वबळावर लढायची तयारी ठेवा!

Abhijeet Shinde

कारागृहात स्पीड पोस्टमधून गांजा

Kalyani Amanagi

कोल्हापूर मनपा घरफाळा घोटाळा तक्रारी `ईडी’कडे

Sumit Tambekar
error: Content is protected !!