Tarun Bharat

वारणेत राष्ट्रीय मतदार जागृती सप्ताह मिमीत्त विविध स्पर्धा संपन्न : आठ स्पर्धकांची निवड

Advertisements

 प्रतिनिधी /वारणानगर 

 कोल्हापूर येथील वारणानगरच्या यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये २५ जानेवारी ‘राष्ट्रीय मतदार दिवस, पूर्व मतदार जागृती सप्ताह’निमित्त विविध स्पर्धां संपन्न झाल्या यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धांसाठीआठ स्पर्धकांची निवड झाली आहे.

 मतदार जागृती सप्ताहनिमित्ताने महाविद्यालयात निबंध, वक्तृत्व, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धां पार पडल्या. पन्हाळ्याचे तहसीलदार आणि मतदार नोंदणी अधिकारी रमेश शेंडगे, निवडणूक नायब तहसीलदार दिलीप सनगर, निवडणूक शाखा अधिकारी सुनील पोतदार यांनी या संदर्भात मार्गदर्शन करून प्रत्येक कला प्रकारात विजेत्या पहिल्या दोन स्पर्धक विद्यार्थ्यांना शासनाचे प्रमाणपत्र आणि भरघोस बक्षीस प्राप्त होणार असल्याचे सांगितले. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे सावकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी शासकीय उपक्रमात आणि राष्ट्रीय मतदार जागृती अभियान कार्यक्रमात युवकांचा सक्रिय सहभाग गरजेचे असल्याचे सांगून स्पर्धांना शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सौ. सुरेखा शहापुरे म्हणाल्या की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेतील तून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्वांवर राष्ट्र उभारणीच्या कार्यात मतदारांचे मोठे योगदान आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य असून प्रत्येक भारतीयाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे.

 स्वागत प्रास्ताविक डॉ. आर. बी. पाटील यांनी केले. समन्वयक व भूगोल शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा डॉ प्रकाश राऊत यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी मानले. यानिमित्ताने संपन्न विविध स्पर्धेत महाविद्यालयातील ५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. एस. एस. खोत, डॉ. एस. एस. जाधव, प्रा.व्ही. जी. सावंत, डॉ.एस. जी. जांभळे यांनी काम पाहिले. निबंध स्पर्धा: संपदा बच्चे, अमृता महाडिक, वक्तृत्व स्पर्धा : प्रणाली पाटील, प्रज्ञा गायकवाड, चित्रकला स्पर्धा: महेश मगदूम शुभांगी खाडे, रांगोळी स्पर्धा: संपदा बच्चे, ऐश्वर्या कुंभार या सर्व विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांची पन्हाळा आणि कोल्हापूर येथे २५ ते ३१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या स्पर्धांसाठी निवड झाली आहे.

Related Stories

Solapur; वागदरीजवळ चारचाकीच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार

Abhijeet Khandekar

राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची होणार निवड

Abhijeet Shinde

वैद्यकीय क्षेत्रातील बुजुर्ग आणि जाणकार व्यक्तिमत्व हरपले

Abhijeet Shinde

जिल्हा परिषद सभा : जिल्हाधिकारी, सीईओंच्या निषेधाचा ठराव

Sumit Tambekar

कोल्हापूर : निगवे खालसाचा जवान संग्राम पाटील शहीद..

Abhijeet Shinde

महात्मा गांधींबद्दलआक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण महाराजला अटक

Sumit Tambekar
error: Content is protected !!