Tarun Bharat

वाराणसी – जौनपुर हायवेवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू; 10 जखमी

ऑनलाईन टीम / जौनपुर : 


वाराणसी – लखनऊ राष्ट्रीय महामार्गावर जलालपुर भागातील लहंगपुर गावाजवळ मंगळवारी पहाटे साधारण 3.30 वाजता ट्रक आणि पीकअप कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. मृत झालेले सर्व जण एक अंतिम संस्कार करून परतत होते. 


मिळालेल्या माहितीनुसार, सरायख्वाजा भागातील जलालपुर गावातील रहिवासी धनदेई देवी (112) यांचे रविवारी निधन झाले होते. खजूरा गावातील रहिवासी जावई लक्ष्मीशंकर आणि गावातील अन्य रहिवाशांसोबत अंतिम संस्कारासाठी शव वाराणसी येथे घेऊन गेले होते. 


तेथून परत घरी येत असताना जौनपुर – वाराणसी हायवे जवळील लहंगपुर गावाजवळ पहाटे 3.30 वाजता विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात पीक अप कारचे पत्रे उडून गेले. या कारमध्ये बसलेले अमर बहादुर यादव (58), रमशृंगार यादव (38), रामदुराल (38), इंद्रजित यादव (48), रामदवर यादव (60) आणि बोधी (65) यांचे यामध्ये निधन झाले. 


या अपघातात अन्य 10 जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा आवाज ऐकून जवळील फुलपुर भागातील औद्योगिक क्षेत्रातील जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केला आहे. 

Related Stories

लखनऊ : माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्या घरावर ईडीची छापेमारी

datta jadhav

जेईई मेन, ‘नीट’ परीक्षा आता सप्टेंबरमध्ये होणार

Patil_p

गरीब मुलांसाठी विनामूल्य स्मार्टफोन

Patil_p

राज्यसभा खासदार महेंद्र प्रसाद कालवश

Patil_p

देशात बाधितांचा आकडा 94 लाखांच्या टप्प्यात

Patil_p

दानवेंविरोधात बंड, ब्रेकफास्ट ते तलवार म्यान?

datta jadhav